विभागातील शिक्षकांचे मी पालकत्व स्विकारले असून मी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे कोणाच्याही बोलण्याने त्यांनी विचलित न होता आपले कार्य विनासायास सुरू ठेवावे, मी सभागृहाबाहेरच नाही तर विधीमंडळाच्या सभागृहात सुध्दा आपली बाजू सक्षमपणे मांडण्यास बांधील आहे. असे प्रतिपादन अमरावती विभाग पदविधर मतदार संघाचे आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री डॉ रणजीत पाटील यांनी केले ते आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग अकोला जिल्ह्याचे वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन व कृतीशील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते या सोहळ्यात अकोला जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या जिल्ह्यातील निवडक (केजी टू पिजी ) शिक्षकांचा यामधे कॉन्व्हेंट स्कूल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालय तसेच आश्रम शाळांमधील एकुण ८५ शिक्षकांचा कृतिशिल शिक्षक पुरस्कार देउन गौरव करण्यात आला
शिक्षक दिनाचे औचित्य साधुन गुरूंना वंदन म्हणून जिल्हातील सर्व प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षक! संघटनाच्या जिल्हाध्यक्षांचे स्वागत स्वत: आमदार डॉ रणजीत पाटील साहेबांनी पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर असलेल्या जिल्ह्यातील काही निवडक शाळांचा “कृतिशील शाळा” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच अध्यापनाच्या कार्यासोबतच उल्लेखनिय शैक्षणिक, सामाजिक कार्य करणार्या निवडक शिक्षकांना “शिक्षक रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
सदर कार्यक्रम आज रविवार दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाचे सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अॅड. मोतिसिंहजी मोहता, अध्यक्ष बि जि ई सोसायटी हे उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी मा. डॉ. अपर्णाताई पाटील, मा. डॉ. नरेशजी बजाज,मा. प्राचार्य सुनिल पांडे, मा प्राचार्य जयंत बोबडे, मा प्राचार्य किरण खंडारे, फादर मॅथ्यू कॅरेकल, सिस्टर निता फर्नांडिस परिषदेच्या राज्य महिला आघाडी प्रमुख वंदना बोर्डे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर यांचेसह जिल्ह्यातील प्राथ, माध्य, उच्च माध्यमिक व मुख्याध्यापक शिक्षक संघटना आदि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर यांनी तर आभार कार्यवाह सचिन काठोळे यांनी मानले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन देवेंद्र वाकचवरे व संजीवनी अठराळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी अतुल पिलात्रे, गजानन काळे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन,दत्तात्रय सोनोने, रूजिता खेतकर, नितीन बंडावार, श्याम कुलट, संतोष वाघमारे, सुनिल माणिकराव, रामभाऊ मालोकार, अरूण वाघमारे, मुरलीधर कुलट, कमलसिंग राठोड, दयाराम बंड, विश्वास पोहरे, रामदास भोपत, संतोषराव इंगळे, चंद्रशेखर पेठे, राजेश मसने, ग.सु.ठाकरे,समाधान उमप रामदास वाघ,विजय धनाडे, सुरेश परमाळे, एहसान पठाण, दिनेश भटकर, अजय पाटील, संतोष रा. इंगळे,अनिल भाकरे, प्रशांत पुराणीक, रविंद्र आवारे, रविंद्र जाधव, बिपिन कुरई,अंजली मानकर, सुनिता कोथळकर, सुरेखा जोशी , जयश्री म्हैसने, सरिता सोळंके, ज्ञानेश्वरी दाळू,नरेंद्र इंगळे,रघुनाथ चव्हाण, गजानन गोतरकर,मनोज राठोड, अनंत मिसाळ, दिगंबर खडसे ,विजय वाकोडे, सतिष खंडारे, निलिमा दांदळे, शिवशंकर अस्वार ,अमोल सराफ, विष्णू झामरे,अश्विन हिंगणकर, धर्मेंद्र चव्हाण, रूपेश सुर्यवंशी ,गजानन शेवलकर ,अरूण भराडी, सुभाष ढोकणे,मनोज वाडकर, निलेश शेगोकार इत्यादींनी परिश्रम घेतले.