संस्कृत म्हणजे संस्कारित भाषा. विश्वातील सर्वच भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा ही सध्या लोप पावते की काय, अशी भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. प्राचीन काळात सर्वाधिक बोलली व लिहीली जाणारी ही भाषा सध्या फक्त काही हजार लोकांपर्यंतच सिमित झाल्याचे पाहून वैषम्य वाटते.
आर्याच्या आगमनाना भारताचा ज्ञात इतिहास हा साधारणत: चार ते पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. आर्याच्या सुरुवातीच्या ग्रंथांच्या अर्थात ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद व अथर्ववेद ग्रंथांच्या रचना संस्कृतमधून झाल्या. पुळेही ब्राम्हणके, आरण्यके इ. ग्रंथ तसेच रामायण, महाभारत यांसारखे काच्च संस्कृतमधूनच रचले गेले. त्यानंतरही आर्य काळ ते पुढील काळातील गुप्तकाळापर्यंत भारतात संस्कृतचाच बोलबाला होता. गुप्त काळात झालेल्या कालीदासाने मेघदूत, शाकुंतल, मालविकाग्निमित्र, रघुवंशम इत्यादी अनमोल साहित्याची रचना संस्कृतमध्येच केली. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात रचल्या गेलेल्या ऐतिहासिक अर्थशास्त्र ग्रंथामूळे हे स्पष्ट होते की, मौर्य काळातही संस्कृतचा बोलबाला होता. याचाच अर्थ असा की, लोकमानसांत व साहित्यातही आर्यकाळ ते गुप्तकाळ असा दोन हजार ते तीन हजार वर्षाचा कालखंड संस्कृतचान होता.
संस्कृतमय प्राचीन भारतात पुढे शक, हुण, कुषाण, पहल्लब इत्यादीची आक्रमणे झाली व आक्रमकांच्या विविध शब्दांमुळे संस्कृतचे महत्व कमी होऊ लागले. तरीही III घराण्यापर्यंतच्या कालखंडात किमान साहित्यात संस्कृतला अनन्यसाधारण महत्व होतेच हे नाकारता येत नाही.
भाषा व बोलीचा उगम हा सातत्याने होत असतो व विविध भाषांमधले शब्द एकमेकांत मिसळून एक नवी भाषा जन्म घेते असे म्हटले जाते. त्यामुळे विविध भाषा आकारास येऊ लागल्या. त्यासोबतच संस्कृतचे महत्व कमी होण्यास काही प्रमाणात संस्कृत भाषाही जबाबदार ठरू लागली, कारण संस्कृतशिवाय इतर भाषा नदीप्रमाणे प्रवाहित असतात. सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाल्यास या भाषा विविध भाषांमधील लोकप्रिय शब्द आपलेसे करतात. उदा. मराठी भाषेमध्ये असलेले ताई, अक्का, अण्णा, अडकित्ता हे शब्द कानडी भाषेतून, अर्ज, ऊर्फ, पेशवा, सामना इत्यादी शब्द फासौं / अरबी भाषांमधून, तर गाजर, बटाटा, मेज इत्यादी शब्द पोर्तुगिज्ञ भाषेतून बेमालुमपणे मिसळून आपलेसे झाले आहेत. संस्कृत भाषेने मात्र इतर भाषांतील कोणताही शब्द स्वीकारलेलाच नाही. परिणामी संस्कृतचे अस्तीत्व हळूहळू कमी होत गेले. त्यामुळे भारतात आक्रमकांच्या आगमनासोबतन प्रांतपरत्वे विविध भाषा आकारास येऊ लागल्या.
संस्कृत भाषेला पुर्वीपासूनच गीर्वान भाषा अर्थात देवतांची भाषा म्हटले जाई. पुरातन काळापासुनच ही भाषा चातुर्वण्य व्यवस्थेतील फक्त ब्राम्हण, क्षत्रीय व वैश्य यांना शिकण्याची परवानगी होती. मात्र मोठया प्रमाणात असलेला स्त्रीवर्ग व शुद्र यांना ही भाषा शिकण्याचा अधिकार नव्हता. हा मोठाच दोष व्यवस्थेत होता. त्यामुळेही संस्कृतची हानी सातत्याने होत गेली.
नवीन युगात मात्र जातव्यवस्था, वर्णव्यवस्था कालबाह ठरली असून सर्वांसाठी सर्व जागतिक क्षेत्र खुले झाले ही अभिमानाची व आनंदाची बाब होय, त्याच पार्श्वभूमीवर संस्कृत भाषा शिकण्याची गरज आहे. संस्कृत शिकण्याची गरज म्हणजे आजही भारतातील प्राचीन काळापासून अस्तीत्वात असलेले मौलीक ग्रंथ या भाषेतच उपलब्ध आहे. त्याचे वाचन करून इतर भाषांमध्ये ते अनुवादीत करण्याचे काम जरी सुरु असले, तरीही त्याला बराच काळ यासाठी लागणार आहे की, सध्या संस्कृत वाचता येणारे व बोलता येणारे फार कमी लोक आहेत. एका अंदाजानुसार फक्त दीड ते दोन लक्ष लोक ही भाषा चांगली वाचू व बोलू संस्कृतचे अध्ययन केल्यास त्यातुन उपलब्ध असणा-या सध्याच्या संधीचा विचार करता संशोधकांना पाण्डुलिपी, तामपत्र, संस्कृतमधील अभिलेख व शिलालेख बान्दारे इतिहासाचे आकलन होण्यासाठी मोठया प्रमाणात संधी आहेत. शिवाय शिक्षक सेवेत येऊ इच्छिणायांना, आर्मी स्कुलमध्ये शिकविण्याची इच्छा असणा-यांना तसेच दुरदर्शनवरील निवेदक, मीडीया प्रवाचक इत्यादी क्षेत्रात स्वत:चे करिअर घडविण्यास इच्छुक असणा-यांसाठी ही भाषा शिकण्याची आवश्यकता आहे. प्राचीन भारतात समृध्द गौरवशाली वारसा चिरकाल टिकावा, यासाठी संस्कृत भाषा ही टिकली पाहीजे, यासाठी शासन स्तरावर नव्याने होणारे प्रयल ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे.
(संस्कृतचे संवर्धन व्हावे व ही भाषा शिकून करिअर घडविण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने २०२२ पासून पोस्ट ग्रेज्यूएट अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. संस्कृत भाषा शिकण्याचे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सम्माननीय कुलगुरू व समन्वयक डॉ. संयोगिता देशमुख यांनी केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही भाषा शिकायची असेल व डिग्रीही आत्मसात करायची असेल त्यांनी विद्यापीठातील संबंधित विभागाशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा.)
डॉ. संयोगिता देशमुख
समन्वयक, संस्कृत भाषा शिक्षण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ