श्री संत गुलाबराव महाराजांचा जीवनपट विलक्षण आहे. त्यांचा जन्म ६ जुलै १८८१ साली अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर (ता. लोणी) येथे झाला. गुलाबराव महाराज हे महाराष्ट्रातील एक मोठे संत, कवी व मराठी लेखक सुद्धा होते. सूत्रग्रंथ, भाष्य प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण व कोश लिहिणारे विसाव्या […]