वऱ्हाडवृत्त डिजीटल वृत्तसेवामुंबई : राज्यातील सेवानिवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना राज्य सरकारच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेंतर्गत दरमहा ११ हजार रूपयांचे निवृत्तीवेतन देण्यात येते. त्यात वाढ करून आता २० हजार रूपये दरमहा निवृत्ती वेतन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केली. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकारिता कल्याण निधी तसेच […]
Month: May 2023
नियमित सायकल चालवणे आरोग्यास लाभदायक
लहानपणी प्रत्येक जण सायकल चालवतो. लहानपणी सायकलची क्रेझ मुलांसोबत मुलींना देखील असते. पण मोठे झाल्यावर सायकलची क्रेझ कमी होते. बालपण सरल्यावर प्रत्येकाला इंधनावर चालणाऱ्या वाहनांची अपेक्षा असते. पण सायकल चालवणं आरोग्यासाठी फार लाभदायक असते. सायकल चालवण्याने मानसिक, शारीरिक आरोग्य सुधारते. त्यामुळे आजार दूर राहतात. सायकल चालवण्याने काय फायदे होतात, वाचा■ […]
चेरापुंजीतील पाणीटंचाई
जगात सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणांमध्ये चेरापुंजीचा उल्लेख केला जातो. याच चेरापुंजीमध्ये सध्या पाणीटंचाईची समस्या जाणवते आहे. यामागे जलवायू परिवर्तन म्हणजेच हवामान बदल हे एक कारण आहेच; ण त्याचबरोबरीने पडणारा पाऊस जमिनीत मुरवण्यासाठीच्या प्रयत्नांचा अभाव आणि बेसुमार वृक्षतोड हेही प्रमुख कारण आहे. प्रश्न आहे तो यातून आपण धडा घेणार की […]
पाणी वापराचा ताळेबंद
पाणी वापराचा ताळेबंदएकविसाव्या शतकाच्या मध्यावधीत अथवा उत्तरार्धात पाणीप्रश्नावरून संघर्ष उफाळून येतील, अशी भाकिते अनेक जाणकारांकडून केली जाताहेत. पाणी प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असूनही पाणी वापराबाबत नागरिकांमध्ये सजगता दिसून येत नाही. आपण प्रत्यक्षरीत्या जेवढ्या पाण्याचा वापर करतो, त्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात आपण पाण्याचा अप्रत्यक्ष वापर करीत असतो. अनेक वस्तू […]
डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी….
सध्या शाळकरी मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांचाच ‘स्क्रीन टाईम’ वाढलेला आहे. सेलफोन, लॅपटॉप, डेस्कटॉप अशा विविध माध्यमांमधून डोळ्यांवर ताण येत असतो. हा ताण कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या अशा…पापण्यांची उघडझापपापण्यांची उघडझाप केल्याने किंवा डोळे मिचकावल्याने डोळ्यांत ‘वंगण’ येण्यास मदत होते आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डिजिटल स्क्रीन वापरताना आपण […]
इलेक्ट्रिकल व्हेईकल नवी क्रांती; नवी संधी
विजेवर चालणाऱ्या वाहनांनी नवा औद्योगिक ‘क्रांतीचे बिगुल वाजवले आहे. जगातील बऱ्याच देशांमध्ये विजेवर चालणाऱ्या (इलेक्ट्रकल व्हेइकल) वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. प्रिसिडंस रिसर्च या संस्थेने जागतिक इलेक्ट्रक वाहनांच्या सध्यस्थितीबद्दल काही दिवसांपूर्वी अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार या क्षेत्राची २०२२ सालाची वार्षिक उलाढाल २०५.५८ बिलियन डॉलर्स होती; तर २०२३ साली ही […]
तुमच्या आधार कार्डला १० वर्षे झालीत… १४ जूनपर्यंत फ्रीमध्ये करा आधार अपडेट, नंतर मोजावे लागणार पैसे
तुमच्या आधार कार्डला १० वर्षे झाली असतील तर त्याला अपडेट करणे गरजेचे आहे. कारण केंद्र सरकारची तशी सूचना आहे. हे सर्व सुरक्षेसाठी केले जाते. १४ जून २०२३ पर्यंत हे अपडेट फ्रीमध्ये करता येईल.सध्या आधार कार्ड डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक कामासाठी आधार कार्डची विचारणा केली जाते. तुमचे १० वर्षे जुने […]
राष्ट्रसंतांचे साहित्य आता संकेतस्थळावर
गुरुकुंज मोझरीराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य जगामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांसाठी जनसंपर्काचे कामकाज करणाऱ्या ‘द पीआर टाईम्स लिमिटेड कंपनी ने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून www.Tukdojimaharaj.com असे संकेतस्थळ तयार केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ११४ व्या ग्रामजयंतीच्या पर्वावर संकेतस्थळाचे अनावरण अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्ष […]