सध्या शाळकरी मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांचाच ‘स्क्रीन टाईम’ वाढलेला आहे. सेलफोन, लॅपटॉप, डेस्कटॉप अशा विविध माध्यमांमधून डोळ्यांवर ताण येत असतो. हा ताण कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या अशा…
पापण्यांची उघडझाप
पापण्यांची उघडझाप केल्याने किंवा डोळे मिचकावल्याने डोळ्यांत ‘वंगण’ येण्यास मदत होते आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डिजिटल स्क्रीन वापरताना आपण कमी वेळा डोळे मिचकावतो, ज्यामुळे डोळे कोरडे होतात आणि डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी डोळे सतत मिचकावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा.
ब्रेक
कामातून वारंवार ब्रेक घेतल्याने डोळ्यांचा ताण कमी होण्यास मदत होते. २० -२०-२० नियम वापरून पाहा, जिथे तुम्ही दर २० मिनिटांनी ब्रेक घ्या, स्क्रीनपासून लांब राहत काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करा.
स्क्रीन सेटिंग्ज बदला
तुमच्या लॅपटॉप स्क्रीनवरची फॉन्ट साईज आणि डिस्प्ले सेटिंग्ज नीट करा. जेणेकरून तुमचे डोळे स्क्रीनवरील मजकूर सहज वाचू शकतील. कॉन्ट्रास्ट आणि ब्राइटनेस लेव्हल तुमच्या डोळ्यांना आरामदायी वाटेल अशी ठेवा.
खोलीतील उजेड
तुमच्या खोलीतील उजेड खूप जास्त किंवा खूप कमी नाही ना याची खात्री करा, त्यामुळे तुमच्या लॅपटॉप स्क्रीनवर उजेड तुमच्या डोळ्यात जाणार नाही. तुमच्या खोलीतील उजेड नीट सेट करा, जेणेकरून तुम्हाला स्क्रीनवर पाहताना अडचण वाटणार नाही. कारण खोलीतील उजेड आणि लॅपटॉपचा उजेड खूप जास्त असतो तेव्हा डोळ्यांवर ताण येतो. योग्य अंतर तुमची लॅपटॉप स्क्रीन तुमच्या डोळ्यांपासून योग्य अंतरावर ठेवा. नेहमी तुमची लॅपटॉप स्क्रीन तुमच्या डोळ्यांपासून किमान २० २८ इंच अंतर ठेवण्याची शिफारस केली जाते.
स्क्रीन प्रोटेक्शन ग्लास
स्क्रीन प्रोटेक्शन ग्लास वापरा, जेणेकरून स्क्रीनच्या वापरामुळे डोळ्यांचा ताण कमी करता येईल. या ग्लासेसला एक विशेष कोटिंग असते जे स्क्रीनद्वारे उत्सर्जित होणारा निळा प्रकाश फिल्टर करते.
आय ड्रॉप्स किंवा अँटी-ग्लेअर फिल्टर्स
जर तुमचे डोळे सतत कोरडे पडत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉप्स वापरल्याने तुमच्या डोळ्यातील वंगण घालण्यास आणि अस्वस्थता दूर करण्यात मदत होऊ शकते. स्क्रीनवरून रिफ्लेक्ट होणारी चमक कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्क्रीनवर अँटी-ग्लेअर फिल्टर देखील वापरू शकता. यामुळे डोळ्यांचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते; पण आय ड्रॉप्स डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरा.
चांगला आहार
निरोगी आहार, पुरेशी विश्रांती घेत तुम्ही डोळ्यांची काळजी घेता येते. व्हिटॅमिन ए, सी आणि ई सारखे आहारातील पोषक घटक डोळे निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत.
स्क्रीन वेळ कमी करा
डोळ्यांचा ताण कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एकूण स्क्रीन वेळ कमी करणे. स्क्रीन टाईम कमी करा आणि आपला वेळ इतर गोष्टींमध्ये घालवा, तुमच्या डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी तुम्ही स्क्रीन न पाहता नियमित ब्रेक घ्या. उठा, फिरा आणि थोडा वेळ चाला.