विजेवर चालणाऱ्या वाहनांनी नवा औद्योगिक ‘क्रांतीचे बिगुल वाजवले आहे. जगातील बऱ्याच देशांमध्ये विजेवर चालणाऱ्या (इलेक्ट्रकल व्हेइकल) वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. प्रिसिडंस रिसर्च या संस्थेने जागतिक इलेक्ट्रक वाहनांच्या सध्यस्थितीबद्दल काही दिवसांपूर्वी अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार या क्षेत्राची २०२२ सालाची वार्षिक उलाढाल २०५.५८ बिलियन डॉलर्स होती; तर २०२३ साली ही उलाढाल १७१६ बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास साडेआठ पट वाढण्याची शक्यता आहे.
भारताची आघाडी
भारताचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री सातत्याने इलेक्ट्रक व्हेइकलबाबत बोलत असतात. पारंपरिक उर्जा संवर्धनासाठी ही वाहने उपयुक्त ठरु शकतील. भारतात ही वाहने रस्त्यावर येऊ लागली आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात मोटारवाहन उत्पादन उद्योग (ऑटोमोबाइल इंडस्ट्री ) इलेक्ट्रक वाहनांच्या निर्मितीवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करतील. त्यामुळे या क्षेत्रासाठी आवश्यक अशा तंत्रकुशल मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणावर भासू शकेल.
तंत्रकुशल मनुष्यबळाची गरज
सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चुरर्स ऑफ इलेक्ट्रक व्हेइकल्स, यांच्या अहवालानुसार २०२३ पर्यंत भारतात या क्षेत्रासाठी ३० मिलियन रोजगार संधी उपलब्ध होतील. ही बाब लक्षात घेऊन भारतातील काही अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी या विषयाशी निगडित वेगवेगळया कालावधीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
२०२५ पर्यंत या क्षेत्रासाठी आवश्यक मनुष्यबळाची कौशल्यनिर्मिती आणि कौशल्य उन्नतीकरण करण्यासाठी भारत सरकारने, डीवाय गुरु या संस्थेसोबत सहकार्यांचा करार केला आहे. हा कर्मशाळा (वर्कशॉप) एकात्मिक प्रशिक्षण (वर्कशॉप इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रॅम) कार्यक्रम आहे. ऑटोमोटिव्ह, ऑटो कंपोनंट, डिझाइन आणि निर्मिती घटकात कार्यरत असणारे किवा कार्यरत होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. संपर्क संकेतस्थळ- https://diyguru.org/electric-vehicle/
आयआयटी मद्रासच्या सेंटर ऑनलाइन एज्युकेशन या विभागाने, ई- मोबिलिटी आणि इलेक्ट्रक व्हेईकल इंजिनीअरिंग सर्टिफिकेट अभ्यासक्रम, सुरु केला आहे. यामध्ये बॅटरीज, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इकॉनॉमिक्स अॅण्ड इकोसिस्टिम इन ई-मोबिलिटी, पॉवरट्रेन अॅण्ड फ्युएल्स, मटेरिअल्स फॉर ई- मोबिलिटी, इलेक्ट्रक व्हेइकल मार्केटची सध्यस्थिती, व्हेइकल इंजिनीअरिंग आणि विकास, मूल्यनिर्धारण आदी विषय घटकांचा यात समावेश आहे. संपर्क दूरध्वनी- ०४४- २२५७८३९०, ईमेल- deanacroffice@iit.ac.in संकेतस्थळ-acr.iitm.ac.in/
या क्षेत्रातील तंत्रकुशल मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन, इंटरशाला प्लेसमेंट गॅरेंटी कोर्स, इंटरशाला ट्रेनिंग या संस्थेने इलेक्ट्रक व्हेइकलच्या संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला असून, त्यात प्रशिक्षणासोबतच इंटर्नशीपची हमी देण्यात आली आहे. हे प्रशिक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यावसायिकांकडून प्रदान करण्यात येते. या क्षेत्रातील उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षण प्रकल्पाचा यात समावेश असेल. अभ्यासक्रम संपल्यावर प्लेसमेंटची तयारीसुध्दा ही संस्था करुन देईल. संकेतस्थळ- https://internshala.com/
कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणेने, एक वर्षं कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ई-मोबिलीटी, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- मेकॅनिकल, प्रॉडक्शन, मेटॅलर्जी अॅण्ड मटेरिअल सायंस, इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग, ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रकल टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन या शाखातील विद्यार्थी पदवीधर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी चाळणी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेतील गुणावर आधारित संवर्गनिहाय प्रवेश निश्चित केला जाईल. या अभ्यासक्रमात, इलेक्ट्रकल व्हेइकल कार्यप्रणाली डिझाइन, एनर्जी स्टोअरजेस सिस्टिम्स, सूपरचार्जेस अॅण्ड फ्युएल सेल्स, पॉवरट्रेनर्स अॅण्ड कंट्रोल्स इन इलेक्ट्रक व्हेइकल, आंतरराष्ट्रीय मानके, इलेक्ट्रक वाहनांबाबत शासनाची नियमावली, अशा सारख्या बाबींचा या समावेश आहे. संपर्क कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, वेलिस्ली रोड, शिवाजी नगर, पुणे- ४११००५, दूरध्वनी- ०२०-२५५०७०००, संकेतस्थळ- http://pgdadmission.coep.org.in/
ग्रेट लेक्स एक्झिक्युटिव्ह या संस्थेने आठ महिने कालावधीचा, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन इलेक्ट्रकल व्हेइकल डिझायनिंग या अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाइन करता येतो. ध्वनीमुद्रित आणि छायाचित्रण केलेले अध्यापन सत्र उपलब्ध करुन देतात. या उद्योगात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांनी या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. प्लेसमेंटसाठी साहाय्य केले जाते. हा अभ्यासक्रम केल्यावर डिझाइन इंजिनीअर, ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी, टेस्टिंग इंजिनीअर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अशासारख्या विविध पदांवर कार्य करण्यासाठी संधी उपलब्ध होऊ शकते. इलेक्ट्रकल, मेकॅनिकल, ऑटोमोबाइल, प्रॉडक्शन, इंडस्ट्रिअल, इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील पदवीधर किंवा या विषयात पदवी अभ्यासक्रमाला असलेले विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतात.
दूरध्वनी- 08037309048, ईमेल – pgpevdesign@greatlearning.in