तुमच्या आधार कार्डला १० वर्षे झाली असतील तर त्याला अपडेट करणे गरजेचे आहे. कारण केंद्र सरकारची तशी सूचना आहे. हे सर्व सुरक्षेसाठी केले जाते. १४ जून २०२३ पर्यंत हे अपडेट फ्रीमध्ये करता येईल.
सध्या आधार कार्ड डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक कामासाठी आधार कार्डची विचारणा केली जाते. तुमचे १० वर्षे जुने आधार कार्ड झाले असेल तर त्याला अपडेट करणे गरजेचे आहे. सरकारकडून सुरक्षेसाठी १० वर्षे जुने आधार कार्डला अपडेट करण्यास सांगितले जात आहे. परंतु, जर तुम्ही १० वर्षांत एकदा जरी आधार कार्ड अपडेट केले असले तरी तुम्हाला आधार कार्डला अपडेट करण्याची गरज नाही.
फ्रीमध्ये करा अपडेट सरकारकडून आधार अपडेट करणे सध्या फ्री आहे. ही सुविधा १५ मार्च ते १४ जूनपर्यंत जारी राहणार आहे. तुम्हाला १४ जून पूर्वी आधार अपडेट करणे गरजेचे आहे. मात्र तुम्हाला १४ जूननंतर आधार अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. कसे कराल आधार अपडेट आधार कार्डला अपडेट करण्यासाठी युजर्सला प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस द्यावा लागतो. या दोन्ही डॉक्युमेंट्सला myaadhaar. uidai.gov.in वर अपलोड करावे लागते. सध्या ही सुविधा फ्री आहे.
आधार अपडेट करण्याची संपूर्ण प्रोसेस
■ सर्वात आधी तुम्हाला मोबाइल किंवा लॅपटॉप वरून UIDAI या वेबसाइटवर जावे लागेल.
■ यानंतर आधार नंबर टाकावा लागेल. नंतर ओटीपी व्हेरिफिकेशनवरून लॉगिन करावे लागेल.
■ नंतर डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करून व्हेरिफाय करावे लागेल.
■ यानंतर तुम्हाला आयडी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफची कॉपी अपलोड करावी लागेल.
■ याप्रमाणे आधार अपडेटची रिक्वेस्ट सबमिट होईल. तसेच आधार स्टेट्स अपडेट मिळेल.
नोट: आधारला ऑनलाइन फ्री अपडेट केले जाऊ शकते. याशिवाय, जवळच्या आधार स्टोअर किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आधारला अपडेट करता येऊ शकते.