शपथ घेऊन सांगतात, आम्ही करु जनसेवा. सत्ता देल्ली हातात की, खात बसतात मेवा. खड्ड्यात गेली जनता, तुमचा खड्ड्यात गेला पक्ष. खुर्ची कशी भेटेल ? फक्त एवढ्यावरच लक्ष. सोयर-ना-सुतक फक्त, खुर्ची साठी मरतात. तेच तुझी आषाढी ला, पहीली पुजा करतात. पापं जिथं धुतल्या जातात, तेच बनते गंगा. अजब तुझा न्याय राज्या, […]
Month: June 2023
जीवाची बंबई (व-हाडी लघुकथा)
संज्या अन बाल्या हे लहानपनापासूनचे जिगरी अन् लंगोटी मैतर असतात. संज्या हा सा-यात शीरीमंत मानगरपालीका बंबईत झाळू खात्यात नोकरीले लागेल अस्ते. त्याचा जिगरी दोस्त संज्या बंबईले गेल्यानं बाल्या गावात एकटा एकटा पळते. बाल्याले संज्या बगर गावात करमत नाह्यी. बाल्याले बंबई पा ची लै ईच्छा असते. पन् गणीत काह्यी केल्या जमत […]
एपिलेप्सीची (फिट्स ) कारणे आणि लक्षणे
माणसाच्या मेंदूमध्ये बारा हजार कोटी मापेशींचा एक समूह असतो. या पेशींचे एकमेकांत सतत चलनवलन सुरू असते. या चलनवलनाचे स्वरूप विद्युत रासायनिक पद्धतीचे असते. हे चलनवलन एका लयीत सुरू असते. काही कारणाने ती लय विस्कळीत होते आणि त्याचा परिणाम म्हणून तीव्रतेने विजेचा ताण मेंदूत पसरतो. तो जेथे जातो तेथील पेशी विघटित […]
दूध भेसळ रोखण्यासाठी आता जिल्हास्तरीय समिती
मुंबई : दूध भेसळीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. दूध भेसळ रोखण्यासाठी राज्यभरात जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या. दुधात भेसळ करणाऱ्यांसोबतच अशा प्रकारचे भेसळयुक्त दूध खरेदी करणाच्या सहकारी, खासगी दूध संघांनाही सहआरोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूधात होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी तसेच ग्राहकांना स्वच्छ […]
संत गुलाबराव गुलाबराव महाराज
श्री संत गुलाबराव महाराजांचा जीवनपट विलक्षण आहे. त्यांचा जन्म ६ जुलै १८८१ साली अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर (ता. लोणी) येथे झाला. गुलाबराव महाराज हे महाराष्ट्रातील एक मोठे संत, कवी व मराठी लेखक सुद्धा होते. सूत्रग्रंथ, भाष्य प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण व कोश लिहिणारे विसाव्या […]
आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (आयसीसी) ने मंगळवारी (२७ जून) एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा भारताच्या यजमानपदाखाली ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा होणार आहे. ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी भारताचा […]
नेमेचि येतो हा पावसाळा, आपले आरोग्य सांभाळा..
अजूनही खरं तर सुरू न झालेला पण प्रायः उन्हाळ्यानंतर नेमेचि येणारा ऋतू म्हणजे पावसाळा. नुकताच ज्याच्या नावाने आपण आषाढ शुद्ध प्रतिपदा साजरी केली, त्या कवी कालिदासाच्या साहित्य निर्मितीचाही प्रेरक असा हा वर्षा ऋतू. मनात असंख्य भावनांनी माणसालाच नव्हे, तर चराचर सृष्टीला भुरळ पाडणारा ऋतू. या काळात काय खावे, प्यावे, आरोग्य […]
लोकमहर्षी भाऊसाहेब – निजाम संबंध : वस्तुस्थिती
‘महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेतील एक देदीप्यमान तारा’ असे आताशा डॉ. पंजाबराव देशमुखांचे वर्णन केले जाते. याच परंपरेतील जे देदीप्यमान तारे होऊन गेले त्यांत अग्रपूजेचा मान म. जोतिराव फुले यांचेकडे जातो. महात्मा फुलेंना आधुनिक भारतातील मूलगामी समाजपरिवर्तनाचे ‘आद्य प्रवर्तक’ म्हणून सामाजिक इतिहासाने आताशा मान्य केले आहे. आपल्या या महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या नेत्यांमध्ये […]
मधुमेहाचा विळखा
अलीकडेच ‘द लॅन्सेट डायबेटीज अॅण्ड एन्डोक्रीनॉलॉजी’ या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये मधुमेहाची देशातील सद्यस्थिती दर्शवणारा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येपैकी ११ टक्के लोकांना मधुमेह हा आजार जडल्याचे नमूद करण्यात आले आहे. मद्रास डायबेटीज रिसर्च फाऊंडेशन (एमडीआरएफ) या संस्थेने इंडिय काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेच्या मदतीने […]
नियमित वाचन – प्रगत करी जीवन !
एखाद्या बाबीवर मनातल्या मनात सखोल व सांगोपांग विचार करणे म्हणजे चिंतन. वाचन चिंतनशीलता शिकविते, विवेकी बनविते. जे चिंतनाकडे पाठ फिरवतात त्यांची वाट लागते. ‘रिकामे मन सैतानाचे ठिकाण असते‘ हा सैतान आपल्या जीवनात सतत ताणच निर्माण करतो. त्यामुळे आपला रिकामा वेळ वाचनात घालवणे हा वेळेचा सर्वात मोठा सदुपयोग आहे. आपल्या आजच्या […]