आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (आयसीसी) ने मंगळवारी (२७ जून) एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा भारताच्या यजमानपदाखाली ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. १५ ऑक्टोबर
रोजी अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा होणार आहे. ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी
आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. १५ नोव्हेंबरला पहिला उपांत्य सामना होणार आहे, तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. कोलकाता आणि मुंबई येथे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत, तर अहमदाबाद येथे अंतिम सामना होणार आहे.
असा असेल कार्यक्रम
५ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (अहमदाबाद )
६ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध क्वॉलिफायर-१ (हैदराबाद)
७ ऑक्टोबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (धर्मशाला)
८ ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चेन्नई)
९ ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध क्वॉलिफायर-१ (हैदराबाद)
१० ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (धर्मशाला)
११ ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दिल्ली)
१२ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध क्वॉलिफायर-२ (हैदराबाद)
१३ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (लखनऊ)
१४ ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (चेन्नई)
१५ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान (अहमदाबाद)
१६ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वॉलिफायर-२ (लखनऊ)
१७ ऑक्टोबर – द. आफ्रिका विरुद्ध क्वॉलिफायर – १ (धर्मशाला)
१८ ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (चेन्नई)
१९ ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश (पुणे)
२० ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (बंगळुरू )
२१ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (मुंबई)
२२ ऑक्टोबर – क्वॉलिफायर-१ विरुद्ध क्वॉलिफायर-२ (लखनऊ)
२३ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड (धर्मशाला)
२४ ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वॉलिफायर-२ (दिल्ली)
२५ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वॉलिफायर – १ (दिल्ली)
२६ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध क्वॉलिफायर-१ (बंगळुरू)
२७ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (चेन्नई)
२८ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (धर्मशाला) २९ ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड (लखनऊ)
३० ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध क्वॉलिफायर-१ ( पुणे )
३१ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (कोलकाता)
१ नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (पुणे)
२ नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वॉलिफायर – २ (मुंबई)
३ नोव्हेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध क्वॉलिफायर-१ (लखनऊ)
४ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड ( अहमदाबाद )
४ नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (बंगळुरू)
५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (कोलकाता)
६ नोव्हेंबर – बांगलादेश विरुद्ध क्वॉलिफायर-१ (दिल्ली)
७ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान (मुंबई)
८ नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध क्वॉलिफायर-१ (पुणे)
९ नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध क्वॉलीफायर-२ (बंगळुरू)
१० नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान (अहमदाबाद)
११ नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वॉलिफायर – १ (बंगळुरू)
१२ नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (कोलकाता)
१२ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (पुणे)
१५ नोव्हेंबर – सेमीफाइनल – १ (मुंबई)
१६ नोव्हेंबर – सेमीफाइनल १ (कोलकाता)
१९ नोव्हेंबर – फायनल (अहमदाबाद)