वऱ्हाडवृत्त डिजिटल
अकोला : माय मराठी साहित्य प्रतिष्ठान अकोला व तरुणाई फाउंडेशन कुटासा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार प्रतिभेचा सन्मान कवीचा या सत्कार समारंभाचे आयोजन दिनांक 11/9/22 रविवार रोजी दुपारी ४ वाजता मराठा सेवा संघ कार्यालय जुन्या आरटीओ ऑफिस येथे करण्यात आले असून त्यात अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यातील प्रतिभावंत साहित्यिकांचे साहित्य यावर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत बी. ए .बी कॉम या अभ्यासक्रमात लागले असून त्यांच्या सत्कार सत्कार समारंभाचे आयोजन करणे हे साहित्यिक संस्थेचे कर्तव्य म्हणून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार अमोल मिटकरी अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकजी पटोकार, तर स्वागत अध्यक्ष म्हणून समाज्सेवक् उमेश मसने हे राहणार आहे व प्रमुख अतिथी म्हणून पुष्पराज गावंडे, प्रा डॉ संतोष हुशे , प्रमोद चोरे, मायाताई ईरतकर, तुळशीराम बोबडे ,प्रा डॉ ममता इंगोले, संजय मा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तरी या सत्कार समारंभाला जास्तीत जास्त साहित्यिक बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देशमुख व जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे सचिव सागर लोडम यांनी केले आहे