मुंबई , (वऱ्हाडवृत्त डिजिटल) : राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज मराठी पत्रकार परिषदेसह पत्रकारांच्या विविध संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात (दि.6 सप्टेबर) भेट घेतली. पत्रकार पेन्शन, अधिस्वीकृती समिती, वृत्तपत्रांची व्दै-वार्षिक पडताळणी, म्हाडा आणि सिडको घरकुलांच्या संदर्भात सरकारने घेतलेला निर्णय त्वरित बदलून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करावे, पत्रकार आरोग्य योजना आदि संदर्भात विविध विभागाची एक बैठक घ्यावी अशी मागणी आम्ही केली. ती मंजूर करीत मुख्यमंत्र्यांनी गणपतीनंतर संबंधित विभागाचे सचिव आणि पत्रकार संघटनांची व्यापक बैठक लावण्यात येईल असे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, टीव्हीजेएचे अध्यक्ष विनोद जगदाळे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, कार्यवाह प्रमोद डोईफोडे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आदिंचा समावेश होता.