डोळ्यांची उघडझाप करणे डोळ्यांची उघडझाप करणे हा एक सोपा आणि परिणामकारक व्यायाम आहे. जेव्हा आपण डोळ्यांची उघडझाप करतो तेव्हा डोळ्याचा पृष्ठभाग स्वच्छ होतो. पापण्यांची उघडझाप केल्याने डोळ्यांमध्ये ओलावा टिकून राहतो. कॉम्प्यूटर. मोबाईल किंवा TV स्क्रीन पाहत असताना आपल्या डोळ्यांची उघडझाप खूप कमी प्रमाणात होते. त्यामुळे डोळे कोरडे होतात आणि डोळ्यांवर ताण येतो, त्यामुळे थोडा ब्रेक घेऊन डोळ्यांची उघडझाप केल्यास फायद्याचे ठरते..
डोळ्यांवर तळहात ठेवा ऑफिसमध्ये किंवा सतत स्क्रीनसमोर काम केल्याने डोळे थकतात.त्यामळे डोळ्यांचा थकवा दर करण्यासाठी दोन्ही तळवे एकत्र चोळा आणि डोळ्यावर ठेवा. यावेळी दोन्ही डोळे झाकून घ्या. ही कृती 3 ते 4 वेळा करा म्हणजे डोळ्यांना आराम मिळेल. डोळ्यांना आराम देण्यासाठी हे सर्वोत्तम योगासन आहे. हा व्यायाम दररोज काही मिनिटांसाठी केल्यास डोळ्यांचा थकवा दूर होऊन, दृष्टी तेजस्वी होती. डोळे फिरवणे (आय रोलिंग) याप्रकाच्या डोळ्यांच्या योगासनामध्ये डोळे हळूवारपणे सलग 2 ते 3 मिनिट गोलाकार फिरवावे. यामध्ये पहिल्यांदा 10 वेळा डोळे क्लॉकवाईज तर नंतर 10 वेळा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये डोळे फिरवावेत. तर दुसऱ्या प्रकारात भिंतीवर एका मोठ्या वर्तुळाची कल्पना करा. दोन्ही डोळ्यांनी त्या काल्पनिक वर्तुळावर नजर फिरवा. तुमच्या डोळ्यासमोरील भिंतीवर दोन टोकांना दोन बिंदूंची कल्पना करा, आणि त्या दोन बिंदूंवर फक्त डोळ्यांची फिरवा. या डोळ्यांच्या योगासनामुळे डोळ्यांच्या स्नायूंची लवचिकता वाढते.
फोकस शिफ्टिंग अनेकदा कॉम्प्युटर, लॅपटॉपच्या स्क्रीनवर सतत काम केल्याने कडे डोळ्यांचे स्नायू कमकुवत होतात. याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चष्मा लागू शकतो किंवा नंबर वाढूही शकतो. त्यामुळे तुमच्या हाताचा अंगठा चेहऱ्यापासून 10 इंच अंतरावर ठेवा. 10-20 फूट अंतरावर असलेल्या एका वस्तूवर केंद्रित करा. त्यानंतर पुन्हा हळूहळू तुमचे लक्ष अंगठ्याकडे वळवा. ही कृती 4 ते 5 वेळा करा.
एकटक नजर लावून पाहणे सूर्य उगवताना किंवा मावळताना त्याच्या किरणांकडे एकटक पहा. दिवसेंदिवस माणसाच्या दैनंदिन जीवनात स्क्रीनचा वापर वाढत आहे. मग ती स्क्रीन मोबाईलची असो, TV ची की कॉम्प्युटरची. दैनंदिन जीवनातील स्क्रीनचा दुष्परिणाम डोळ्यांवरदेखील होत आहेत. स्क्रीनच्या अति वापरामुळे डोळ्यावर ताण येऊन डोळ्यांच्या अनेक समस्या देखील उद्भवत आहेत. याचबरोबर मंद प्रकाशात वाचन करणे, तेजस्वी आणि ब्राईट लाईटच्या नेहमी संपर्कात असल्यानेही डोळ्यांना इजा पोहोचू शकते. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, डोळे आरोग्यदायी ठेवण्यासाठी ही योगासने करणे डोळ्यासाठी फायदेशीर ठरते.