आपल्या शरीराला जितके पाणी मिळेल तितके ते चांगले राहते. जशी खाण्याची, झोपण्याची, वाचण्याची, इतर कामे करण्याची एक पध्दत असते तशीच पाणी पिण्याचीही एक योग्य पध्दत असते. नेहमी खाली बसून थोडे थोडे पाणी प्यावे. याचे अनेक फायदे आहेत. खाली बसून थोडे थोडे पाणी पिण्याचे फायदे आज आपण जाणून घेऊया.
पचनक्रिया चांगली राहते जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो, तेव्हा दाबासकट पाणी पोटात पोहोचते. पाण्याचा वेग जास्त असल्याने पोट, आजूबाजूची जागा आणि आपल्या पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी नेहमी पाणी पिताना शांतपणे बसून एक एक घोट घ्या. यामुळे पचनक्रिया चांगली राहते.
मूत्रपिंड उत्तम राहतात मूत्रपिंडांचे कार्य चांगले चालणे आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहीत आहेच. जेव्हा आपण बसून एक एक घोट पाणी पिता, तेव्हा आपल्या ब्लॅडरमध्ये साचलेले टाकाऊ पदार्थ साफ होतात आणि मूत्रपिंडांचे कार्य चांगल्या पध्दतीने चालू राहते.
फुप्फुसे निरोगी राहतात पळताना किंवा उभे राहून पाणी पिण्याने आपल्या पूर्ण शरीरव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे आपल्या फुप्फुसांवरही परिणाम होऊ शकतो. अन्ननलिका आणि श्वासनलिकांना होणारा प्राणवायूचा पुरवठा थांबू शकतो. जेव्हा आपण आरामात बसून पाणी पिता, तेव्हा फुप्फुसे निरोगी राहतात.
तहान भागते पाणी शरीरासाठी अत्यावश्यक आहे. माणूस अन्नाशिवाय अनेक दिवस जिवंत राहू शकतो, पण पाण्याविना जगण्याची शक्यता खपच कमी असते. शरीरात 70% पाणी असते. जर शरीरात पाण्याचे प्रमाण 1 टक्क्याने कमी झाले तर आपल्याला तहान लागते. जेव्हां आपण पाणी पिण्यासाठी बसतो, तेव्हां आपल्या मेंदूला शरीराची पाण्याची आवश्यकता पूर्ण झाल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. पण जेव्हां आपण उभे राहून पाणी पितो तेव्हां तहान पुरेशी भागत नाही. शरीराला पुरेसे पाणी मिळाले तर कुठलेही त्वचारोग होण्याची शक्यता खूप कमी होते. जेव्हा आपण शांतपणे बसून एक एक घोट पाणी पितो तेव्हा शरीराची पाण्याची गरज व्यवस्थित पूर्ण होते. यामुळे आपली त्वचा उजळते.