महावितरणच्या पेमेंट वॉलेटसाठी लघू उद्योजकांना संधी
वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. महावितरणने स्वतः चे पेमेंट वॉलेट सुरू केले असून आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या पतसंस्था तसेच किराणा, मेडिकल व जनरल स्टोअर्सचालकांना वॉलेटधारक होता येईल. यातून वीज ग्राहकांना विशेषतः ग्राम ीण भागात वीजबिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रतीबिल पावतीमागे ५ रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास मिळणार आहे.
वॉलेटधारक होण्यास इच्छुक असणाऱ्या पतसंस्थांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक, गुमास्ता प्रमाणपत्र (शॉप क्ट), पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रद्द केलेला धनादेश आदी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्या विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. मुख्य कार्यालयाकडून अर्जाला मंजुरी मि ळाल्यानंतर वॉलेट रिचार्ज करावे लागेल.
डेबिट व क्रेडिट कार्ड तसेच ऑनलाईन बँकिंगच्या आधारे वॉलेट रिचार्ज करता येईल. वॉलेटधारक महावितरणच्या पमध्ये नोंदणी करून महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेऊ शकतील.
वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर बिल भरणा झाल्याचा एसएमएस तत्काळ मिळणार असल्याने ग्राहकांचे जागेवर समाधान होऊ शकेल. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉग-ईनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा वॉलेटमध्ये देण्यात आली असून याचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जाईल.
वॉलेटधारकास प्रती बिलामागे ५ रुपये कमिशन मिळणार असून महिना अखेरीस ते वॉलेटमध्ये जमा करण्यात येईल. शहर व ग्रामीण भागातील अधिकाधिक पतसंस्था, दुकानदार यांनी वॉलेटधारक होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.