वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
राशी: मेष
स्वामी : मंगळ
देवता : भगवान विष्णू
जप मंत्र : ॐ श्रीलक्ष्मीनारायणाय नमः उपास्यदेव : श्री गणेश
रत्न : पोवळे
जन्माक्षर : चू चे चो ला ली लू लेलो अ
आ चै लृ ललं. ‘लू
मेष राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही अग्नी तत्त्वाची रास असून, ही रास क्रांतिवृत्ताच्या १ ते ३० अंशात पसरली आहे. मेष राशीच्या व्यक्ती तापट, कर्तबगार, व्यावहारिक दृष्टिकोण ठेवणाऱ्या, धीट, महत्त्वाकांक्षी, कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणाऱ्या अशा असतात. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव, कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो. हे अरसिक, रुक्ष, कठोर, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात. कालपुरुषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधित त्रास जसे दाह, मस्तकशूळ वगैरे तसेच चेहऱ्याचा पक्षाघात, नेत्रदोष, कर्णदोष, रक्तदाब वाढणे असे विकार होतात. मेष राशीच्या स्वभावानुसार यांच्यात नेतृत्व करण्याचे गुण असल्यामुळे राजकारणी, सैन्य अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त यशस्वी होतात.
राशी : कर्क
स्वामी : चंद्र
देवता : हरिवंश
जप मंत्र : ॐ ह्रीं हरिहराय नमः
उपास्यदेव : शिव
रत्न : मोती
जन्माक्षर : हि हि हुहू हे हो डडा डि डी ड् डूडो डॉ.
ही राशी ४ आकड्याने दर्शवतात. पुनर्वसु नक्षत्राचे एक चरण, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रे मिळून ही रास बनते. कर्क राशीचा जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्रकिनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. कर्क रास पृष्ठोदयी आहे. उत्तर दिशेकडे विशेष बलवान असते. साधारणपणे ही रास चंचल, कोमल, सौम्य पण अस्थिर स्वभावाची दिसून येते. ही रास रजोगुणी, जलतत्त्वयुक्त आहे, तसेच रात्री बलवान असणारी, कफ प्रकृतीची, स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा, लज्जा आणि विवेक.
राशी : तूळ
स्वामी शुक्र
देवता : भगवान राम
जप मंत्र : ॐ श्री रामाय नमः
उपास्यदेव : दुर्गा देवी
रत्न : हिरा
जन्माक्षर : र रा ऋ री रि रु रू रेरो त ता तृ त्रा ति ती तु तू ते.
तूळ हा एक अंतराळातील तारका समूह आहे. बारा राशीतली ही एक ज्योतिष-राशी आहे. यावर शुक्र (ज्योतिष) ग्रहाचा अंमल आहे. तूळ रास कुंडलीमध्ये ७ आकड्याने दर्शवतात. ही वायू तत्त्व असलेली रास आहे. चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण, स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते.
या व्यक्ती आकर्षक, सुंदर, प्रेमळ, कष्टाळू, सौंदर्यप्रेमी, न्यायप्रिय आणि नीतिवान असतात. अंतःकरण जाणून घेण्याची हातोटी दिसून येते.
राशी: मकर
स्वामी : शनी
देवता : ब्रह्ममातृक
जप मंत्र: ॐ श्री वत्सायउपेन्द्राय नमः
उपास्यदेव : हनुमान
रत्न : नीलम
जन्माक्षर : भो ज जा जी ख खा खि खीखे खो खुगगा ग्रगृगी ग्रीं गि गं.
या राशीवर शनी (ज्योतिष) चा अंमल आहे. व्यवहारी, धोरणी, महत्त्वाकांक्षी, शिस्तप्रिय. मेंढा आणि अर्ध शरीर माझा असा याचे बोधचिन्ह आहे. मकर राशीचे लोक खूप व्यवहारी, धोरणी, महत्त्वाकांक्षी, शिस्तप्रिय, संयमी असे असतात. मकर राशीच्या लोकांना सगळ्या गोष्टींबद्दल थोडीशी निराश वृत्ती असते.
राशी : वृषभ
स्वामी : शुक्र
देवता : वासुदेव विश्वरूप
जप मंत्र : ॐ ह्रीं विश्वरूपायनमः
उपास्यदेव : दुर्गा देवी रत्न : हीरा
जन्माक्षर : ओ औ इ उ ए ऐ वा व वीवि वु वू वे वं ई ऊ.
वृषभ राशीवर शुक्र (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही रास कष्टाळूपणा, सोशिकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते. ही सम राशी आहे. कुंडलीतील समस्थानात सम राशी सामान्यतः बलवान असते, असे मानले जाते. ही स्थिर आणि पृथ्वी तत्त्वाची राशी आहे. तसेच ही चतुष्पाद राशी आहे. चतुष्पाद राशी दशम भावात बलवान असतात. ही पृष्ठोदय राशी आणि रात्रीबली राशी आहे. ही मध्यम प्रसव आहे. वृषभ ही रास चंद्राची रास आहे. या राशीच्या व्यक्ती तेजस्वी, बुद्धिमान असतात. लोकांना आपलेसे करणारी ही रास आहे.
राशी : सिंह
स्वामी : सूर्य
देवता : भगवान मुकुंद
जप मंत्र: ॐ बालमुकुंदाय नमः उपास्यदेव : सूर्य देवता रत्न : माणिक
जन्माक्षर : म मृ मा मि मी मू मेमो ट टा ट्र टि टी ट्री टे ट्रे टैटौ ट्रा.
अग्नितत्व राशी आहे. या ग्रहावर रवि (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही राशी वंध्या राशी म्हणूनही ओळखली जाते. कुंडलीमध्ये ५ आकड्याने ही दर्शवली जाते. सूर्य व मंगळ हे या राशीचे कारक ग्रह आहेत. ही अग्नितत्त्व, पुरुष राशी आहे. राशीचा स्वामी सूर्य (ज्योतिष) आहे. यांना अधिकार गाजवणे आवडते. भरपूर स्फूर्ती तत्त्वनिष्ठता आकर्षता, आशावाद असलेली ही राशी आहे. जिद्दीने उभारी घेण्याची हिंमत ठेवतात. मिरवण्याची हौस असते, मान सन्मान आवडतात. ताकद आणि चपळाई भरपूर असते.
राशी : वृश्चिक
स्वामी : मंगळ
देवता : जानकी जी
जप मंत्र : ॐ श्री क्लीं जानकीरामाय नमः
उपास्यदेव : श्री गणेश
रत्न : पोवळे
जन्माक्षर : तो न ना नृ नि नी नुनू नो नौ य या यी यू.
या राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाचा अंमल आहे. ही जलतत्त्वाची आणि स्थिरस्वभावाची आहे. ही चंद्राची नीच रास
आहे. ही रास असणारी माणसे शारीरिकदृष्ट्या चिवट, काटक व स्पष्टवक्ती असतात. त्यांच्यात प्रतिकूलपरिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता असते. त्यांना जबरदस्त इच्छाशक्ती असते आणि ती कुटुंबावर अतिशय प्रेम करतात.
राशी : कुंभ
स्वामी : शनी
देवता : गोपाल गोविंद
जप मंत्र : ॐ श्री गोपालगोविन्दाय नमः
उपास्यदेव : दत्तात्रेय
रत्न:-नीलम / गोमेद
जन्माक्षर : गु गू गे ग्रेगो ससस्त्र साश श्र श्री श्री सुसू से सो शो द दू दा.
ही बौद्धिक तत्त्वाची रास आहे. मित्र राशी मिथुन व तूळ. त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुंभ राशीला सगळ्या गोष्टींची आधीच माहिती असते. कुंभ राशीचे लोक हुशार, मैत्रीपूर्ण, निसर्गप्रिय, प्रामाणिक, स्वावलंबी, नवीन संकल्पना सुचणारी असतात. या राशीला आहारावर नियंत्रण करणे सहज जमते.
राशी : मिथुन
स्वामी : बुध
देवता : केशव
जप मंत्र : ॐ क्रीं केशवाय नमः
उपास्यदेव : श्री कुबेर
रत्न : पाचू जन्माक्षर : क कृ का कि की कु कू घघृ घा ड छ छा के कौ ह
हा. मिथुन राशीवर बुध (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही वायुतत्त्वाची रास आहे. या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती हे दोन महत्त्वाचे गुण या राशीत आढळतात.
राशी : कन्या
स्वामी : बुध
देवता : पीतांबर
जप मंत्र : ॐ ह्री परमात्मने नमः
उपास्यदेव : श्री कुबेर
रत्न : पाचू जन्माक्षर : टोट्रोप पापृ प्रपि प्रि प्री पी पु पूषणठ पे प्रे प्रो.
कन्या रास एक ज्योतिष-राशी आहे. राशीवर बुधाचा अंमल आहे. द्विस्वभाव, पृथ्वी तत्त्वाची ही रास असून, विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. मीन रास कन्या राशीचा विरोधी रास मानली जाते. उत्कृष्ट बुद्धिमत्ता संशोधक वृत्ती दिसून येते. वेळी कामाला येणारी अचाट स्मरणशक्ती आढळते. बुद्धीचातुर्य, हजरजबाबीपणा, हास्यविनोद याच्या जोरावर उत्कृष्ट लोकप्रियता मिळते. निरीक्षण हातोटी उत्तम. अंतर्मनाचा थांग लागू देत नाहीत. पैशांच्या बाबतीत काटेकोर, दूरचा विचार करणारी असतात. माणसाची उत्तम पारख असते.
राशी : धनु
स्वामी : गुरू
देवता : धरणीधर
जप मंत्र : ॐ ह्रीं श्रीं क्रींधरणीधराय नमः उपास्यदेव : श्री दत्तात्रेय
रत्न : पुष्कराज
जन्माक्षर : ये यो भ भा भे भा भृभृं धृध धा ढाका फ्रैं फि फूंफुं.
ही अग्नितत्त्वाची रास आहे. यावर गुरू (ज्योतिष) चा अंमल आहे. ही द्विस्वभावी राशी रास असलेल्या माणसाचा स्वभाव काहीसा संतापी, पण याचवेळी संयमी आणि आहे. ही सात्त्विक असतो. माणसात अध्यात्माची ओढ दिसते. तो आशावादी असतो आणि त्याच्यात परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपणा, उदारपणा व समाजसेवाकरण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते.
राशी : मीन
स्वामी : गुरू
देवता: चक्रपाणी
जप मंत्र : ॐ ह्रीं क्रीं चक्रायनमः
उपास्यदेव : हनुमान
रत्नः पुष्कराज / लसणी
जन्माक्षर : दी ची दिदु दूथ थाथ झ झं झा दे द्रे द्रो दो च चा चं.
ही द्विस्वभावी राशी आहे. कन्या रास मीन राशीचा विरोधी रास मानली जाते. माशाला पाठीचा कणा नसतो. त्यामुळे मीन मानसिक व शारीरिक बाबतीत खूप लवचिक असतात. मीन राशीचे लोक सदैव मदतीस तत्पर, संवेदनशील, कल्पक, कधीही नाही न म्हणणारे असे असतात. मीन राशीला व्यवहार जमत नाही, तसेच जास्त वेळी लक्ष देणाऱ्या व्यायाम प्रकारांना ते कंटाळतात. मीन राशीचा खाण्यावर ताबा अजिबात नसतो. पोहता न येणारी मीन राशीची व्यक्ती क्वचित आढळते.