नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेत, अनेक औषधांचे दर कमी केले आहेत. यामुळे ताप, संसर्ग, कोलेस्ट्रॉल, शुगरसह १०० औषधे स्वस्त होणार आहेत. एनपीपीए म्हणजेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अॅथॉरिटीने ६ ९ नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत आणि ३१ ची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. देशात आजारांवर उपचार करणे खूप महाग होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. कोलेस्टेरॉल, शुगर, अंगदुखी, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी३, लहान मुलांची अँटिबायोटिक्स यासह १०० औषधे स्वस्त होतील. यामुळे लोकांचा आरोग्यसेवेवरचा खर्च कमी होणार असून, औषधांच्या काळाबाजारावरही नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.(वृत्तसंस्था)
About The Author
Post Views: 83