मधुमेहाचा आजार म्हटला तर अनेक विचार मनात घोळू लागतात. रक्तातील साखर वाढल्या अनेक गोड पदार्थ खाण्यावर नियत्रंण येते. सर्वात भयानक आजारापैकी हा एक आजार असल्यामुळे मधुमेहग्रस्त व्यक्तीला सर्वसामन्य जीवन जगण्याच्या क्षमतेवर अनेक बंधने येतात. त्या शिवाय आहारावरील बंधने, वेळेवर
औषधांचे सेवन, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे, अशा अनेक गोष्टी न चुकता कराव्या लागतात. त्यामुळेच मधुमेहाला ‘राजरोग’ किंवा आजीवन आजार म्हणतात. अशा या आजारावर शस्त्रक्रियेव्दारे नियंत्रण मिळवीणे शक्य असल्याचे मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलचे कन्सल्टंट बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. रामेन गोयल यांनी स्पष्ट केले. एका चर्चासत्रात त्यांनी ही माहिती दिली. साधरणपणे मधुमेहाचे दोन प्रकार असून पहिला प्रकार हा मुलामध्ये होतो. जेथे स्वादुपिंडाची समस्या सुरू होते व या मुलांना सुरूवातीपासूनच इन्सुलिनची आवश्यकता भासते. दुसरा प्रकार सामान्य ६० ते ८० वयोगटांतील लोकांमध्ये आढळतो. स्नायुच्या पेशी रक्तातील साखर शोषून घेण्यास सक्षम नसतात, म्हणून रक्तातील साखर वाढत राहते.