गणेशोत्सवाची धामधूम संपत नाही तोच १२ सप्टेबरपासून विदर्भात विविध ठिकाणी हाडपक्या (मस्कऱ्या) गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नागपुरातील सीनियर भोसला पॅलेसमधील हाडपक्या गणपतीला २ ३५ वर्षांचा इतिहास असून परंपरागत पद्धतीने तो आजही साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्ताने दहा विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले यांच्या काळात हाडपक्या गणपतीची १२ हातांची २१ फूट उंच मूर्ती स्थापन केली जात होती. आतासुद्धा त्याच प्रकारची मूर्ती स्थापन करण्यात येते.
१७८७मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले ऊर्फ चिमणाबापू यांनी हाडपक्या गणेशोत्सव आयोजित केला होता. एकदा चिमणाबापू बंगालवर विजय मिळवून परत येईपर्यंत कुळाच्या गणपतीचे विसर्जन झाले होते. त्यामुळे त्यांनी बंगाल विजयाचा आनंद साजरा करण्याकरिता मस्कऱ्या गणपतीची स्थापना केली. त्यात नकला, लावणी, खडी गंमत असे कार्यक्रम आयोजित करून त्याला आनंदोत्सवाचे स्वरूप दिले. चिमणाबापूंनी पितृपक्षात सुरू केलेली
ही परंपरा आजही कायम आहे. यंदा या उत्सवाला २३५ वर्षे पूर्ण होत आहेत. चिमणाबापूंच्या काळात गणपतीची १२ हातांची, २१ फुटांची मूर्ती स्थापन केली जायची. २००५पासून १२ हातांची साडेतीन फूटांची मूर्ती पूजेसाठी ठेवण्यात येते. मूळ गणेशाची मूर्ती शिवाजी महाराजांच्या रूपात ८ फुटांची स्थापित केली जाते. विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवामध्ये जे काही पारंपरिक उत्सव साजरे केले जातात त्यात मारबतीच्या मिरवणुकीला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसाच वारसा आणि परंपरा या मस्कऱ्या गणपती उत्सवाला असून आजतागायत ती टिकवून ठेवली आहे. गणेशोत्सव आटोपल्यानंतर आता रविवारी चतुर्थीला नागपूरसह विदर्भात उमरेड, मौदा, कामठी, भिवापूर, वर्धा, खापरखेडा, काटोल कळमेश्वर, कुही, मांढळ आदी गावांमध्ये मस्कऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. महालातील सीनियर भोसला पॅलेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हाडपक्या गणपती उत्सव साजरा केला जातो.
इ.स. १७८७ मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमणाबापू यांनी या उत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवाचा इतिहास सांगताना श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी सांगितले, शूर लढवय्ये राजे खंडोजी महाराज भोसले हे अन्यायाच्या विरोधात लढत असताना ते बंगालच्या स्वारीवर गेले. बंगालवर विजय मिळवला व स्वारीहून परत येत असताना कुळाचाराच्या घरगुती गणपतीचे विसर्जन झाले होते. बंगालवर विजय मिळवल्याचा आनंदोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने पितृपक्षात मस्कऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
या उत्सवाला सार्वजनिक रूप १७८७ मध्ये राजे खंडोजी महाराजांनी दिले आणि तेव्हापासून आजतागायत हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला २५८ वर्षे झाली आहेत. २००५ पासून सीनियर भोसला पॅलेसमध्ये हा उत्सव होत आहे. हाडपक्या गणपती नवसाला पावतो अशी ख्याती पूर्वीपासून सांगण्यात येते. दहा दिवस होणाऱ्या या उत्सवात विविध कला प्रकार, लावण्या, खडी गंमत यांसारखे कार्यक्रम होऊ लागले.
१७५५ मध्ये या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यात आले. श्रीमंत राजे खंडोजी महाराजांनी चालू केलेली ही प्रथा आजही सुरू आहे. मध्यंतरी हा उत्सव घरगुती वातावरणात साजरा करण्यात येत होता. मात्र २००५ पासून महालातील सीनियर भोसला पॅलेसमध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे. महालातील झेंडा चौक परिसरात शहीद शंकर महाले यांच्या पुतळ्याजवळ गेल्या अनेक वर्षांपासून हाडपक्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जाणार आहे. दहा दिवस होणाऱ्या या उत्सवात विविध लोककला प्रकार सादर केले जातात. नंदनवन, मानेवाडा, इतवारी, झिंगाबाई टाकळी, जयताळा या भागात मस्कऱ्या गणपती उत्सव साजरा केला जातो. २७ सप्टेंबरला बाप्पाचे विसर्जन होणार आहे.
। महेश उपदेव