जगातील सर्वात आश्चर्यकारक स्टेशनांच्या यादीत मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. ‘वंडर्सलिस्ट’ या संकेतस्थळाने जगातील दहा आश्चर्यकारक रेल्वेस्थानकांची यादी जाहीर केली असून त्यात सीएसटीएमचाही समावेश केला आहे. या यादीत सीएसटीएम दुसऱ्या तर न्यूयॉर्कचं ग्रँड सेंट्रल टर्मिनल पहिल्या स्थानावर आहे. या यादीत लंडनचं सेंट पँक्रास इंटरनॅशनल तिसऱ्या, मॅड्रिडचं अटोचा स्टेशन चौथ्या आणि अँटवर्पमधील अँटवर्प स्टेशन पाचव्या स्थानावर आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेलं आहे. हे स्टेशन म्हणजे वास्तुकलेचा अदभत नमना असन फेडीक विल्यम स्टिव्हन्सने हे स्टेशन बांधलं आहे. मुघल आणि व्हिक्टोरियन गॉथिकच्या वास्तूकलेवर आधारित हे स्टेशन आहे. या स्टेशनचं नाव आधी व्हिक्टोरिया टर्मिनस असं होतं. नंतर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं. भारतातलं सर्वात व्यस्त असं हे स्टेशन असून रोज तीन दशलक्ष प्रवासी प्रवास करतात, असा गौरव या संकेतस्थळानं केला आहे. मध्य रेल्वेनंही ट्रिट करून ही माहिती दिली आहे.
‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात ‘सीएसएमटी’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे या ठिकाणाला ‘सर्वो त्कृष्ट स्वच्छ प्रेक्षणीय स्थळ’ पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत देशभरातील १०० प्रेक्षणीय स्थळांची निवड करण्यात आली. यात तीन टप्प्यांमध्ये एकूण ३० स्थानके निवडण्यात आली. पहिल्या टप्प्यांत ‘सीएसएमटी’ स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. ६ सप्टेंबरला नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला असून, यामध्ये ‘सीएसएमटी’सह मुंबई महापालिका, सीएसआर भागीदार यांना संयुक्तपणे या पुरस्काराने गौरविण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. ‘युनेस्को’सह केंद्रीय मंत्रालयाच्या पर्यटन, सांस्कृतिक आणि गृहनिर्माण व शहरी कामकाज यांच्या निवड समितीने मसीएसएमटीफ स्थानकाची निवड केली. सामाजिक दायित्व निधीचा वापर कशाप्रकारे आणि कोणत्या कामांसाठी केला यासह परिसर स्वच्छता, सातत्य या पातळीवरील निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
सीएसएमटीची खास वैशिष्ट्ये
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. सीएसएमटी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. १८७८ मध्ये या स्थानकाच्या बांधकामाची सुरुवात झाली. या स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दहा वर्ष लागली. त्या काळात कोणतीही इमारत बांधण्यासाठी लागलेला
सर्वाधिक वेळ आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले. या स्थानकाची रचना फेड्रीक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटीश स्थापत्यकाराने केली आहे. या कामासाठी फेड्रक यांना त्याकाळी १६ लाख १४ हजार रुपयांचे मानधन देण्यात आले होते. या स्थानकाची रचना ही लंडनमधील सेंट पॅकार्स रेल्वे स्थानकाशी मिळतीजुळती आहे. सीएसटीएमटी स्थानकाची रचना ही व्हिक्टोरियन इटालियन गॉथिक रिव्हायवल प्रकारची आहे. स्थानकाच्या मुख्यभागी असलेल्या घड्याळाखाली क्विन एलिझाबेदचा पुतळा होता. मात्र १९५० साली भारत सरकारच्या आदेशानुसार सर्व इमारतीवरील ब्रिटिशांचे पुतळे हटवण्यास सरुवात करण्यात आली. त्यामध्येच हा पुतळाही काढून टाकण्यात आला. हा पुतळानंतर १९८० पर्यंत राणीच्या बागेत तो उघड्यावर पडून होता. नंतर त्याचे काय झाले यासंदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत दिलेल्या अर्जात या पुतळ्यासंदर्भात सरकारकडे कोणतीची माहिती नसल्याचे समोर आले. हा पुतळा तस्करीच्या माध्यामातून भारताबाहेर नेऊन विकण्यात आला किंवा नष्ट करण्यात आला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मार्च १९९६ पर्यंत या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असे होते. मात्र या स्थानकाचे नामकरण करुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) असे ठेवण्यात आले. मार्च १९९६ ते जून २०१७ दरम्यान हे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) नावाने ओळखले जायचे. २०१७ साली जून महिन्यामध्ये स्थानकाच्या नावात महाराज हा शब्द लावण्यात आला आणि तेव्हा पासून हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) म्हणून ओळखले जाते. सीएसएमटी स्थानकामध्ये १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकाचे आहेत. फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात. महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भूत आणि देखण्या सात आश्चर्याची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यांमध्ये या स्थानकालाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. रात्री साडेनऊच्या सुमारास अजमल कसाब आणि त्याचा साथीदार ए के ४७ बंदूका घेऊन अंदाधुंद गोळीबार करत स्थानकामध्ये शिरले. या हल्ल्यात सीएसटी स्थानकावरील ५८ जणांचा मृत्यू झाला तर १०४ जण जखमी झाले. स्लमडॉग मिलेनियर या सिनेमातील जय हो हे गाणे या स्थानकात चित्रित करण्यात आले आहे. तसेच २०११ साली आलेल्या रा.वन. सिनेमामध्येही हे स्थानक दाखवण्यात आले आहे. मुंबईतील सर्वात गजबजलेले स्थानक असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील प्रवाशांची संख्या घटली आहे. मागील वर्षात म्हणजेच २००७ ते २०१८ दरम्यान सीएसएमटी स्थानकात तब्बल ४७.४ टक्के प्रवाशांची संख्या घटली असल्याचे समोर आले आहे.