वऱ्हाडवृत्त डिजिटील
ऑफ इंडियात ज्युनिअर असोसिएट्स पदाकरिता नोकरभरती होणार आहे. या नोकरभरतीमध्ये जास्तीत जास्त स्थानिक भुमिपुत्रांची भरती व्हावी म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ प्रयत्नशील असून इच्छुक उमेदवारांनी या भरतीकरिता www.sbi.co.in/careers या संकेतस्थळावर मंगळवार २७ सप्टेंबर २०२२पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन केले आहे. नोकरभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२२पर्यंत सर्वसाधारण वर्गाकरिता २० ते २८ वर्षांपर्यंत असावे. तसेच आरक्षित प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा शासकीय नियमानुसार सवलत, शिथिलता असेल. महाराष्ट्रात एकूण पदांची संख्या ७४७ असून जे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झाले असतील ते या परीक्षेकरिता अर्ज करू शकतात. परीक्षेसाठी अर्ज शुल्क सर्वसाधारण, ओबीसी, ईबीसी उमेदवारांकरिता ७५० रुपये व एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, ईएक्सएसएम उमेदवारांकरिता शुल्क माफ आहे. या पदासाठी पूर्व परीक्षा नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित यंत्रणेद्वारे घेतली जाणार आहे.