आजच्या विज्ञान युगातही अवघे जग पंथ–पंथांमध्ये विभागले जात असून, स्वत:च्या श्रद्धा इतरांवर लादण्याचा प्रकार सुरू आहे. या सगळ्यांवर उपाय आहे तो म्हणजे स्वामी विवेकानंदांचा संपूर्ण जगाला एक कुटुंब म्हणून पाहण्याची दृष्टी देणारा विश्वबंधुत्वाचा संदेश.
साधारणपणे १८९० च्यास आसपास विदेशी सत्ताधीश आपल्या प्राचीन धमाच्या किल्ल्याला सुरुंग लावीत त्यांच्या धर्माचे वर्चस्व भारतासह सान्या जगावर प्रस्थापित करू पाहत होते. आपापल्या जातीच्या संकुचित बावड्यांमध्येच डुंबत तमासगीर होऊन हिंदू धर्माचा विध्वंस मोकाट बघत राहणाऱ्या हिंदू धर्मीयांमध्ये जागरूकता, आक्रमता आणण्याची गरज होती. हिंदू धर्मातील सहिष्णू व विश्वबंधुत्वाची भावना भारतातच नव्हे तर जगभरात पोहचवण्याचे महत्त्वपूर्ण काम स्वामी विवेकानंदांनी केले.
हिंदू धर्माच्या चिरंतर मूल्यांचा प्रसार करून ऋषीमुनींनी निर्मिलेल्या हिंदू धर्मात नवचेतना आणायची घडी येऊन ठेपली होती. प्रांतवादाच्या दमघोटू जाणिवेत जगत न राहता भारत वर्षाच्या भल्यासाठी उदार अंत:करणानं सर्व देशवसीयांत एकी आणून विविध जीवनशैलींचे सर्व झरे एकत्र आणून भारत वर्षातील हिंदू धर्माला पुनरूपी जगवायचं ध्येय स्वामी विवेकानंदांच्या समोर होतं.
१८९३ साली सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील शिकागो येथे विश्व धर्म महासभेचे आयोजन केले गेले होते. महासभेचा अप्रत्यक्ष उद्देश ख्रिश्चन धर्माला ‘जगातील एकमेव खरा धर्म’ म्हणून घोषित करणे हा होता. ख्रिश्चन आणि इस्लामसारखे सेमिटिक धर्म मानवी इतिहासातील भीषण रक्तपात आणि हत्याकांडासाठी जबाबदार आहेत. असेच विशिष्ट धर्माचा विशेष असण्याचा दृष्टिकोन हा मानवजातीसाठी बंधुत्त्व साधण्यात सर्वात मोठा अडथळा आहे याची स्वामी विवेकानंदांना पूर्ण जाणीव होती. या महासभेत मांडल्या जाणाऱ्या हिंदू धर्माची त्यातील विश्वबंधुत्वाची महती सर्व जगताला विशेषतः पाश्चिमात्य देशातील लोकांना अवगत होणार असल्याने या महासभेत जाण्याचे विवेकानंदांनी ठरवले.
शिकागोपर्यंत पोहचण्याच्या त्यांच्या मार्गात आलेल्या अनंत अडचणींवर मात करत स्वामीजी तिथे पोहचले. भारताचे प्रतिनिधित्व करायला निघालेल्या विवेकानंदांजवळ काय नव्हतं. वेदउपनिषदांचा सखोल अभ्यास, बौद्ध-जैन, शैव-वैष्णव, खिस्ती-इस्लामादी धर्मसंप्रदायाची परिपूर्ण जाण त्यांना होती. गुरुनानक, मीराबाई व तानसेनही त्यांच्या ओठांवर होते. महाराष्ट्राचे संत कवी व दक्षिणात्य अलवार व नयनारही त्यांच्या स्मृतीत विराजमान होते! आणि त्याहूनही लक्षणीय सत्य की विवेकानंद अशा महामानवाचे शिष्य होते की ज्यांचे जीवनच एक जिवंत सर्वधर्म संमेलन होवं, ९ सप्टेंबरला स्वामीजी शिकागोला पोहोचले. प्रवासात महत्त्वाचा पत्ता हरवून गेला होता, त्यांना शिकागोच्या रेल्वे याडात यावं लागलं. तिथे एक रिकामा खोका पडला होता. स्वामी त्यात शिरले. ईश्वराचं नाव घेतलं आणि काळजी मुक्त होऊन बिदास झोपून गेले. रेल्वे वाडातील एका
खोक्यात झोपलेला विवेकानंद नावाचा तो भारतपुत्र फक्त दोन दिवसांनंतर साऱ्या अमेरिकेला हादरवून सोडणार होता याची कुणाला कल्पनाही नव्हती. धर्ममहासभा! सभ्य जगताच्या इतिहासातील प्रथम सर्वधर्मसंमेलन! समस्त ख्रिस्ती दुनियेला, विशेषतः अमेरिकेला इतर, अधिक उदात, तकशुद्ध आणि शायार्थात पारंगत धर्मसुद्धा आहेत हे शिकवणारी पाठशाला ठरली होती ती धर्मशाळा! सोमवार ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागोचं आर्ट इनिस्टयूट सभागृहात जगातल्या सर्व धर्माच्या प्रतिनिधींचं संमेलन येथे भरलं होतं. कैथलिक आणि प्रोटेस्टंट दोन्ही पंधीय, ख्रिश्चन, ज्यू, इस्लाम, बौद्ध, जैन, हिंदू अशा अनेक धर्माचे धर्मगुरू आपापल्या संप्रदायाचा प्रचार करायला तेथे उपस्थित होते.
सर्वधर्म मार्तडांनी आपल्या व्याख्यानांची टिपणं काढली होती, त्या सर्वांच्या मध्येच सुमारे ३० वर्षांचा एक तेजस्वी वैरागी बसला होता, व्याख्यान काय द्यायचं हेसुद्धा त्याने ठरवलं नव्हतं मग टिपणं कुठली? बाकी सर्व मंडळी वाक्पटूत्वाच्या जोरावर आपापल्या संकुचित संप्रदायाचा प्रचार करायला आली होती, पण हा विवेकानंद नावाचा झंजावात मात्र हिंदू धर्माची म्हणजेच मानव धर्माची महती तिथे गाणार होता. विवेकानंद व्यासपीठावर आल्यावर ते सुदृढ शरीर, मनोहर रूप, तेजस्वी नजर, भगव्या कफनीतल्या त्या पुरुषी
सौंदर्याकडे श्रोते बघतच राहिले, स्वामीजानी संबोधनाचे फक्त पहिले पाच शब्द उच्चारले ते संबोधन होतं, ‘सिस्टर अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका….’ ‘लेडीज अँड जेंटलमन’ ऐकणाऱ्या अमेरिकन लोकांना हे संबोधन अगदी नवं होतं. फक्त नवं नव्हतं, त्यात खरेपणा होता, फड जिंकण्याची ती क्लृप्ती नव्हती तर समस्त मानव जातीवर नि:स्वार्थी प्रेम करणाऱ्या एका निष्ठावान ब्रह्मचाऱ्याचे ते सहजोद्गार होते.
स्वामीजींच्या भाषणातील ते पहिले पाच शब्द ऐकताच श्रोते उभे राहिले आणि त्यानंतर अमेरिकी शिष्टाचाराच्या पलीकडे जाऊन सतत दोन मिनिटांच्या वर सभागृह टाळ्यांच्या कडकडाटत अक्षरशः गुंजत राहिलं. फक्त संबोधनानं अपरिचित समाज जिंकणारे विवेकानंद पहिले आणि बहुदा शेवटचेही!
ते आपल्या भाषणात म्हणाले, अमेरिकन बंधू-भगिनींनो तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मला अतिशय आनंद झाला आहे. सर्वांना सामावून घेणारा माझा धर्म आणि देश यांचा मला अभिमान वाटतो, ‘माझ्याकडे कोणीही, कोणत्याही मार्गाने आला तरी मी त्यांच्याकडे पोहचेन’, अशा अर्थाचं गीतेत एक वचन आहे. मला वाटतं आजची परिषद ही याचसाठी आहे. ते आपल्या भाषणात म्हणाले की मला अभिमान आहे की मी त्या देशाचा आहे. ज्याने सर्व धर्म आणि सर्व देशांतील शोषित आणि निवासितांना आश्रय दिला.
आज सांप्रदायिकता, धर्माधता यामुळे हिंसाचार वाढला आहे. या परिषदेमुळे हे धर्मवेड, हिंसाचार छळवणूक यांचा शेवर होईल त्यांनी आपल्या भाषणाद्वारे भारतीय संस्कृती, सभ्यता आणि तत्त्वज्ञान जगभरातील लोकांसमोर मांडले. भारत आणि भारतीयत्व जगासमोर एका नव्या दृष्टीकोनातून मांडणारे हे अमर भाषण तसं छोटं असलं तरीही त्याचा आकाशाएवढा औदार्यभाव, मानवतेची मूल्यतत्व आणि वैश्विक ऐक्याचा सच्चा संदेश ओतप्रोत भरला होता.
या व्याख्यानानंतर २७ सप्टेंबरच्या समारोपापर्यंत विविध विषयांवरील विवेकानंदांच्या व्याख्यानांनी धर्ममहासभा संमेलन गाजवले. स्वामी विवेकानंद म्हणाले
की, लडा नाही तर सहकार्य, विनाश नाही तर समन्वय, विवाद नाही तर शांतता आणि सौहार्द असा आपला प्रयत्न असायला हवा. हे एक कठीण ध्येय आहे, परंतु ते अप्राप्य नाही, आणि त्या दिशेने कार्य करण्याचे तत्वज्ञान आणि आंतरिक सामर्थ्य असलेली कोणतीही सभ्यता जगात असेल तर ती हिंदू सभ्यता आहे. क्षुधार्थ लोकांना घाच्या गोष्टी सांगणं किंवा त्यांना तत्वज्ञान समजावून सांगण्याचा यत्न करणं म्हणजे त्यांची विटंबना करणं असं ठणकावून सांगत मानवतेच्या, जनकल्याणाच्या इतर गोष्टींवर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विवेकानंदांचा सर्वधर्म समन्वयाचा संदेश जर रीतसर अंगीकारला गेला तर भारतात आणि सबंध जगातच सांप्रदायिक दंग्याधोप्यांची इतिश्री होईल हे देखील तेव्हा अनेकांच्या लक्षात आले.
या अभूतपूर्व सर्वधर्मसंमेलनात विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाची जगावर अशी काही छाप पडली की जगाला भारतीय धर्माचं दर्शन घडलं. पौर्वात्य असूनदेखील त्यांनी नारीजातेला अग्रपूजेचा मान देऊन, अखिल वसुधेलाच स्वतःचं कुटुंब म्हणून संबोधताच समस्त श्रोतेसमुदयाच्या हृदयात उटलेली अनुभूत लहर भारतीय विश्वाबंधुत्वाच्या संस्कृतिला मानसन्मान देऊन गेली. धर्ममहासभेतील स्वामी विवेकानंदांचा संदेश जरी विश्वबंधुत्वाचा असला तरी ही हिंदु राष्ट्राच्या पुनरुत्थानाची हाक ठरली.
११ सप्टेंबर १८९३ च्या रात्री विवेकानंदांचे व्याख्यान आटोपताच शिकागोचे नागरिक त्यांचे दिवाणे झाले. त्याच रात्री चौकाचौकात स्वामीजींची छायाचित्र मढवून लावण्यात आली आणि लोक त्यांना नम्र अभिवादन करू लागले. अमेरिकेसारख्या विज्ञाननिष्ठ समाजानं विवेकानंदांची अध्यात्मिक शक्ती विनाशर्त, विनासंशय मान्य केली होती. वृत्तपत्रांतले अहवाल त्यांच्यावर प्रशसेची पुष्पवृष्टी करीत होते. त्यांनी विश्वाच्या पडद्यावर महानायक म्हणून छवी उमटवत भारतीय विश्वाबंधुत्वाच्या संस्कृतीचा जयघोष जगभर पोहचवला होता. भारतीयांना काफिर समजून सुधारणेसाठी पाथिमात्य देशांतून मिशनरी पाठवणाऱ्या अमेरिकांना स्वतः सुधारणेसाठी भारतातून तिकडे मिशनरी बोलवायची गरज आहे असे वाटू लागले होते.
शिकागोला पार पडलेल्या धर्मसर्वधर्म महासभेत विवेकानंद सर्वश्रेष्ठ झंजावती वका ठरले. अमेरिकेतील जनता आणि वृत्तपत्र यांनी स्वामीजींना अक्षरशः डोक्यावर घेतलं, इतर धर्म मातंडांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि वक्तृत्वगुणांचा गौरव केलाच पण त्याचबरोबर स्वामीजींच्या संन्यास्त वृत्तीचा आणि ब्रह्मचयाच्या कडक उपासनेचाही आदर केला.
आजही अनेक देश जातीयवादाच्या आगीत जळत आहे. एकमेकांच्या जमिनी बळकावण्यात व्यस्त आहे. प्रत्येक पंथ एकमेकांपेक्षा वरचढ दाखवण्याची स्पर्धा करत आहे. या सर्वामध्ये स्वामीजींचा विश्वबंधुत्वाचा संदेश समाजाला कटुतेतून दूर करत संपूर्ण जगाला एक कुटुंब म्हणून पाहण्याची दृष्टी देत अनोखा मार्ग दाखवत आहे.
पंकज पाटील ९८५०४३०५७९