भारतात मधुमेहींची संख्या सर्वाधिक आहे. घड्याळाच्या काट्यावर धावती जीवनशैली, आहारातील असमतोल, व्यसन, ताणतणाव, अनुवांशिकता असे अनेक घटक मधुमेहासाठी कारणीभूत ठरतात. अनेकांची रक्तातील साखरेची पातळी इतकी वाढते की, ती नियंत्रित करण्यासाठी कसून प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदलही केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण मिळविता येते. त्यासाठी आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मधुमेहींनी
आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा, प्रमाण आणि पथ्य लक्षात ठेवावं. प्रवासात खाण्याच्या वेळा बदलल्या तरी दर तीन-साडेतीन तासांनी खायला विसरू नका. प्रवासात हलका, पचायला सोपा आहार असावा.
मसालेदार, तेलकट, तिखट, जळजळीत पदार्थ शक्यतो टाळावेत..
आपल्या आहारात उष्मांकाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी ठराविक वेळाने आहार पेणे जरुरी आहे. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते. फायबर एका निरोगी आहाराचा भाग आहे. आहारात अनेक प्रकारे निरोगी गोष्टी पेणं गरजेचं आहे. फायबरमुळे डायबिटीज थांबवण्यासाठी आणि मनेज करण्यासाठी मदत होते. फायबरमुळे पचनशक्ती वाढण्यासही मदत होते. फायबर एक प्रकारचे कार्योहायड्रेट असून, यामध्ये मुख्य रूपात फळे, भाज्या, फळभाज्यांचा समावेश आहे.
फायवरमध्ये ब्लड शुगर कंट्रोल करण्याची क्षमता आहे. शरीरात फायबर इतर कार्योडायड्रेटप्रमाणे स्पाइकचं कारण बनत नाही. याच कारणामुळे शरीरातील व्लड शुगर नियंत्रण आणि मॅनेज करण्यास मदत करते. आहारातील
कर्बोदके आणि शर्करा कमी झाली व मधुमेहाची औषधे नेहमीप्रमाणेच सुरू असतील तर त्याने साखरेची पातळी कमी होऊ शकते.
वाटाणा सोडून सर्व मोड आलेली कडधान्यं मधुमेहींनी खावीत, कारण मोड आणण्याच्या प्रक्रियेत स्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. तृणधान्यात्त बाली, नाचणी ही मधुमेहींसाठी चांगली. फळांत सफरचंद, पीच, चेरी, आलुबखार, नासपती खाण्यास हरकत नाही.
दररोज ठरलेल्या वेळी जेवण करा। आपल्या शरीराला आपल्या खाण्याच्या पद्धतीची सवय लावा आणि त्यानुसार काम करू द्या! जेवण आणि न्याहरी दरम्यान २ ते ३ तासांच अंतर ठेवा, हे आपल्याला हायपोग्लासमीक (कमी साखर) भाग आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करते. मधुमेहींनी उपवास करणे शक्यतो टाळावे.. उपवासामुळे शरीरातील रासायनिक क्रियेत बदल होतो. त्याचा मधुमेहावर दुष्परिणाम होतो म्हणून पूर्ण उपवास करण्याचे टाळावे. उपवास करणे अत्यंत आवश्यक असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात बदल
अनियंत्रित उच्च रक्त शर्करेमुळे हृदयरोग, अंधत्व आणि मूत्रपिंड निकामी होणे अशा आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचा योका असतो. अनियंत्रित रक्त शर्करमुळे अनेक मधुमेहींना त्यांचा पाय गमवावा लागते तर मधुमेह असलेल्या लोकांमध्ये संक्रमणे विकसित होण्याचा धोका जास्त असतो. रक्तातील साखरेची पातळी सामान्य किंवा त्या पातळीच्या आसपास राखाली तर मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंतीना प्रतिबंध करण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी रक्तशकरा नियंत्रित ठेवण्यासाठी तिची नियमित तपासणी केली पाहिजे.
-डॉ. राहल बस्ते
मधुमेहविकारतज्ज्ञ, वोक्हार्ट रुग्णालय