२०२२–२३ हे ‘इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेट्स‘ म्हणजेच ‘भरडधान्य वर्ष‘ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात देखील भरडधान्य शेतीला प्रोत्साहन देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी भरडधान्य उपयुक्त आहेच त्याचबरोबर ते मानवाला पोषक तत्व प्रदान करतात. भरडधान्य घेण्याबाबत शेतकऱ्यांत आणखी जनजागृती करणे गरजेचे आहे.
गेल्या दोन दशकांपासून संपूर्ण जग हवामान “बदलाचा सामना करत आहे. काही ठिकाणी दष्काळ तर काही ठिकाणी महापूर पाहवयास मि ळत आहे. भारत, पाकिस्तानसह आशियायी देशात दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा पाहवयास मिळत आहे. पाकिस्तानमध्ये सध्या पावसाने हाहा:कार माजविला आहे. तेथे ४० टक्क्यांपेक्षा अधिक पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. अगोदरच आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तान पुराने पार कोसळला आहे. अशा अस्थिर स्थितीत कोणते पीक घ्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू शकतो; परंतु त्याचा मुकाबला शेतकरीच करू शकतात. त्यांनी पीक चक्राचे अनुसरण केल्यास आणि निसर्गाच्या अनुकूल पीक घेतल्यास नैसर्गिक संकटाच्या काळात होणारे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते. अशावेळी “मिलेट्स क्रॉप (भरडधान्य) हा एक समाधानकारक तोडगा मानला जाईल.
कृषी तज्ज्ञांच्या मते, भरडधान्याच्या पिकांना पाणी कमी लागते. उसाच्या एका कांड्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यभरात २१०० मिलीलिटर पाण्याची गरज भासते. त्याचवेळी बाजरीला ३५० मिलीलिटरची पाणी हवे असते. ज्वारीसाठी देखील पाणी फार लागत नाही. भातशेतीला बाजरीपेक्षा ५० पट अधिक पाण्याची गरज भासते. भरडधान्य केवळ नैसर्गिकच नाही तर मानवी आरोग्यासाठी देखील पोषक आहे. यात केवळ शेती खर्चावर अंकुश बसणार नाही तर औषध फवारणीपोटी होणाऱ्या खर्चावर देखील नियंत्रण मिळवता येते. भरडधान्याला ‘मिलेंट्स’ किंवा ‘सुपरफूड’ असेही म्हटले जाते. अपेक्षापेक्षा अधिक पोषक तत्त्व असणाऱ्या खाद्यपदार्थांना ‘सुपरफूड’ असे म्हटले जाते. त्यात ग्लायसेमिकचा भार देखील कमी राहतो. सुपरफूडमध्ये प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, कोडो, राळा, कांग, कुटू, राजगिरा, सनवा चिना आदींचा समावेश होतो. या धान्यांत गहू आणि तांदळाच्या तुलनेत ‘सोल्यूबल फायबर’ अधिक असते. मधुमेह, हायपरटेन्शन यासारख्या आजारपणात हे फूड उपयुक्त ठरते. याशिवाय आयरनचे प्रमाण देखील अधिक असते. याचाच अर्थ या फूड्सच्या माध्यमातून खाद्यसंस्कृती चांगली होऊ शकते आणि लोकांचे कुपोषण आणि आजारपणापासून सुटका होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा भरडधान्याचे पिक घेण्याचे आवाहन केले आहे. ‘मन की बात’ या कार्यक्रमात या पिकांना चालना देण्यासाठी त्यांनी लोकचळवळ सुरू करण्याची भूमिका मांडली. या माध्यमातून देशातील कुपोषणमुक्तीला चालना मिळू शकते. भरडधान्याचे पिक दुष्काळ आणि बेमोसमी पावसाचा मुकाबला करण्यासाठी मदत करू शकते. तसेच पाणीपातळीवरचा वाढता दबाव कमी करण्यास देखील हातभार लागेल. आणखी एक फायदा म्हणजे भरडधान्यांच्या पिकाने पशुधनाला देखील वैरण मि ळू शकते. यावर जगभरात देखील गांभीर्याने विचार केला जात आहे. संयुक्त राष्ट्राने देखील २०२३ हे ‘आंतरराष्टीय भरडधान्य वर्ष’ घोषित केले आहे. हे पीक घेण्याचा आणखी एक फायदा म्हणजे सिंचनापासून ते देखभाल करण्यापर्यंत पिक घेण्यासाठी फारसे श्रम लागत नाही. परंतु असे सांगितल्याने देशभरातील सर्व शेतकरी धान, ऊसाची शेती सोडन भरडधान्याचे पिक घेतील असे नाही. यासाठी सरकारला आपल्या पातळीवर संपूर्ण तयारी करावी लागेल. सर्वात अगोदर तर शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करावी लागेल. भरडधान्याचे पिक आपल्यासाठी आणि देशासाठी किती फायदेशीर आहे, हे त्यांना पटवून सांगावे लागेल. त्याचवेळी भरडधान्याचे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात पुरवठा साखळी तयार करावी लागेल. शेतकऱ्यांना अशा प्रकारची सुविधा मिळत असेल तर ते स्वत:च भरडधान्याचे पिक घेण्यासाठी उत्सुक होतील.
नवनाथ वारे, कृषीअभ्यासक