माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीचा दिवस रथसप्तमी किंवा अचला सप्तमी म्हणून साजरा केला जातो. यंदा रथसप्तमी १६ फेब्रुवारी २०२४ या दिवशी आहे. हिंदू धर्मात रथसप्तमीला खूप महत्त्व आहे. या दिवसाला आरोग्य सप्तमी म्हणूनदेखील ओळखले जाते. या दिवशी भगवान सूर्य देवाची पूजा केली जाते. सूर्यदेवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण हात, अशी श्रद्धा आहे. मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हळदी-कुंकू कार्यक्रमाचादेखील रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी स्नान, दान, होम आणि पूजा केल्यास कित्येक पटीने फलदायी ठरते.
■ रथसप्तमीची कथा
एकदा भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला त्याच्या शारीरिक सामर्थ्याचा गर्व होता. तो सतत सर्वांचा अपमान करत होता. वाईट वागण्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नव्हते. एके दिवशी दुर्वास ऋषी भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले, तेव्हा ते खूप दुर्बल दिसत होते. त्यांना पाहून सांब त्यांची चेष्टा करू लागला आणि त्यांचा अपमान करू लागला. सांबच्या या वागण्याने संतप्त झालेल्या दुर्वास ऋषींनी त्याला, तू कुष्ठरोगी होशील, असा शाप दिला. त्यानंतर सांबची स्थिती पाहून श्रीकृष्णाने त्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्यास सांगितले. वडिलांच्या आज्ञेचे पालन करून सांबने या दिवशी भगवान सूर्याची पूजा केली. काही काळानंतर तो रोगातून मुक्त झाला. तेव्हापासून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्याची प्रथा सुरू झाली. असे मानले जाते की, ही उपासना केल्याने कुंडलीतील सूर्याशी संबंधित दोष दूर होतात. व्यक्ती रोगमुक्त होते आणि जीवनात पैशाची, संपत्तीशी आणि मुलांशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही.
■ पूजाविधी कसा असतो?
या दिवशी सूर्य देवाची पूजा करण्यासाठी सूर्योदय होण्यापूर्वी स्नान करा आणि सूर्याला अर्घ्य द्यावे.
घराच्या बाहेर सात रंगांच्या रांगोळी काढा. त्याच्या मध्यभागी एक चारमुखी दिवा लावा.
सूर्याला लाल रंगाचे फूल, कुंकू, अक्षता, दक्षिणा, गूळ, चणे अर्पण करा.
दिवसभर गायत्री मंत्र किंवा सूर्य मंत्राचा जप करा. आदित्य हृदय स्तोत्र वाचा.
गहू, गूळ, तीळ, लाल कपडा आणि तांब्याची भांडी एखाद्या गरीब व्यक्तीला दान म्हणून द्या.
■ रथसप्तमीच्या दिवशी काय करू नये
रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये
वादविवाद करू नका.
रथसप्तमीला वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करावा.
■ रथसप्तमीला विशेष महत्त्व असणारी सूर्य मंदिरे !
रथ सप्तमी हा सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सूर्य देव हे तेजाचे प्रतिक है. या दिवशी सूर्याची पूजा केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. रथ सप्तमी हा सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सूर्य देव हे तेजाचे प्रतिक हे. या दिवशी सूर्याची पूजा केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला धन, आरोग्य आणि संतान प्राप्त होते.
रथ सप्तमीला तीर्थस्नान केल्यानं सात प्रकारच्या महापापांचा नाश होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. दरम्यान, रथसप्तमीला सूर्यदेव आपल्या रथावर बसतात अशीही आख्यायिका आहे. तसेच रथसप्तमीपासून तीळ तीळ दिवस वाढत जातो. या दिवसांत दिवस मोठा व रात्र लहान असते. यादरम्यान ऊन दिवसेंदिवस वाढत जाते असेही म्हटल्या जाते.
■ प्रथम क्रमांकावर कोणार्क सुर्यमंदिर
भगवान सूर्यदेवाच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये कोणार्कचे सूर्यमंदिर प्रथम क्रमांकावर आहे. ओडिशामध्ये असलेले कोणार्कचे सूर्य मंदिर देशभरात नाही जगभरात प्रसिद्ध आहे.कोणार्कच्या सूर्य मंदिराची स्थापना भगवान श्रीकृष्णाचे पुत्र सांब यांनी केली होती. त्यानंतर हे सूर्यमंदिर तेराव्या शतकात राज नरसिंहदेव यांनी बांधले. त्याचबरोबर हे मंदिर त्याच्या भव्यतेसाठी आणि कलाकुसरीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्योदयाचा पहिला किरण मंदिराच्या मुख्य दरवाजावर पडतो.
■ झालरापाटन सूर्य मंदिर !!
झालरापाटन, राजस्थानातील शहर असून या शहराला विहिरींचे शहर असेही म्हणतात. शहराच्या मध्यभागी असलेले सूर्यमंदिर हे झालरापाटणचे पर्यटकांचे आकर्षण आहे. त्याच वेळी हे दहाव्या शतकात माळव्यातील परमार घराण्यातील राजांनी बांधले होते. या मंदिराच्या गर्भगृहात भगवान विष्णूची मूर्ती आहे.
■ बिहारचे अनोखे मंदिर
बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात सूर्यदेवाचे एक अनोखे मंदिर आहे. य मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा दरवाजा पूर्व दिशेऐवजी पश्चिम दिशेला आहे. जिथे सात रथांवर भगवान सूर्याच्य तीन रूपाचे दर्शन होते. धार्मिक मान्यतेनुसार या सूर्य मंदिराचा दरवाजा एका रात्रीत आपोआप दुसरीकडे बदलले गेले. गुजरातमधील मोढेरा सूर्यमंदिर हे त्याच्या वास्तुकलेचा अतुलनीय नमुना आहे. जो सोळंकी वंशाचे राजा भीमदेव प्रथम यांनी १०२६ मध्ये बांधला होता. मोढेराचे सूर्य मंदिर दोन भागात बांधले गेले आहे, ज्यामध्ये पहिला भाग गर्भगृहाचा आहे आणि दुसरा सभामंडपाचा आहे. महत्त्वाचे म्हणजे सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट गर्भगृहात पडतील अशा पद्धतीने मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.
■ आंध्रप्रदेशचे सूर्य मंदिर!
आंध्र प्रदेशातील अरसावल्ली गावाच्या पूर्वेला सुमारे १ किमी अंतरावर सुमारे १३०० वर्षे जुने भगवान सूर्याचे भव्य मंदिर आहे. येथे भगवान सूर्य नारायणाची त्यांच्या पत्नी उषा आणि छाया यांच्यासह पूजा केली जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून दोनदा सूर्याचा पहिला किरण थेट मूर्तीवर पडतो. असे म्हटले जाते की या मंदिरात भगवान सूर्याचे दर्शन केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते.
■ बेर सूर्य मंदिर, बिहार
बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील बेलौर गावाच्या पश्चिम आणि दक्षिण टोकाला असलेले बेलौर सूर्य मंदिर खूप जुने आहे. ते राजाने बांधलेल्या ५२ तलावांच्या मध्यभागी बांधले आहे. या ठिकाणी मनोभावे छठ व्रत पाळणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे म्हणतात.
■ काश्मीरचे मार्तंड मंदिर !
काश्मीरमधील मार्तंड मंदिर हे देशभरातील प्रसिद्ध सूर्य मंदिरांपैकी एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर काश्मीरच्या दक्षिण भागात अनंतनाग आणि पहलगामच्या रस्त्यात मार्तंड नावाच्या ठिकाणी आहे. हे मंदिर कर्कोटा राजघराण्यातील राजा ललितादित्य याने आठव्या शतकात बांधले होते, असे म्हटले जाते.