मराठी साहित्यात ग्रामीण जीवन, दुष्काळ आणि शेतकरी संघर्षांचे हृदयस्पर्शी चित्रण करणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे शनिवारी (ता. २७ सप्टेंबर २०२५) निधन झाले. लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. […]
