कोलकाताचे प्रसिद्ध भरतनाट्यम आणि कुचुपुडी नृत्यांगन अमरनाथ घोष यांची मंगळवारी संध्याकाळी काही अज्ञात इसमांनी अमेरिकेच्या मिसूरी इथ गोळ्या झाडून हत्या केली. शिकागो इथल्या भारतीय वाणिज्य दूतावास कार्यालयाने घोष यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रती तीव्र शोक व्यक्त केला असून, न्यायवैद्यक अधिकारी आणि पोलिसांसह तपास चालू असल्याचं म्हटलं आहे.
प्रख्यात दूरदर्शन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्यजी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या एका पोस्ट मध्ये म्हटले आहे की सेंट लुईस अकादमी शेजारी राहणाऱ्या त्यांच्या मित्राची गोळ्या घालून करण्यात आली असून भारतीय दूतावासाने त्यांच्या मृतदेहावर दावा करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. अमरनाथ घोष यांच्या हत्येमागील कारण आणि आरोपींचा तपशील अद्याप कळू शकला नाही, असही भट्टाचार्जी यांनी सांगितलं. भट्टाचार्जी म्हणाली- घोष यांनी सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठात शिक्षण घेतले. ते फाइन आर्ट्समध्ये मास्टर्स करत होते. त्यांचे आई-वडील आधीच मरण पावले होते.