मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख जाहीर केले आहेत. प्रचारात समन्वय राखण्यासाठी शिवसेनेचे ३८ जिल्हाप्रमुख काम करतील. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी खासदार आणि आमदारही प्रचार करणार आहेत. निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे संपर्क प्रमुखांना शिवसेना नेतृत्वाने निर्देश दिले आहेत. खासदार नरेश म्हस्केंकडे ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. एकूण ४० ठिकाणी पक्षाकडून जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरेंकडून याबाबतचे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे.

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख यादी
1. सिंधुदुर्ग – 1) श्री. किरण पावसकर 2) श्री. राजेश मोरे 2. रत्नागिरी- श्री. यशवंत जाधव 3. रायगड ग्रामीण- श्री. संजय घाडी 4. नवी मुंबई शहर – श्री. नरेश म्हस्के 5. पालघर – श्री. रवींद्र फाटक 6. ठाणे ग्रामीण – श्री. प्रकाश पाटील 7. ठाणे शहर – श्री. नरेश म्हस्के 8. पुणे – श्री. नरेश म्हस्के 9. पिंपरी चिंचवड शहर – श्री. सिद्धेश कदम 10. पुणे ग्रामीण – 1) श्री. श्रीरंग आप्पा बारणे 2) श्री. रामभाऊ रेपाळे 11. सातारा – श्री. शरद कणसे 12. सांगली – श्री. राजेश क्षीरसागर 13. कोल्हापूर – 1) श्री. धैर्यशील माने 2) श्री. संजय मंडलिक 14. सोलापूर – श्री. संजय कदम 15. नाशिक लोकसभा – श्री. रामभाऊ रेपाळे 16. दिंडोरी लोकसभा – 1) श्री. रामभाऊ रेपाळे 2) श्री. भाऊसाहेब चौधरी 17. जळगाव – श्री. सुनिल चौधरी 18. नंदुरबार – श्री. राजेंद्र गावित 19. धुळे – श्री. मंजुळा गावित 20. छत्रपती संभाजीनगर महानगर – श्री. विलास पारकर 21. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण – श्री. अर्जुन खोतकर 22. जालना – 1) श्री. अर्जुन खोतकर 2) श्री. भास्कर आंबेकर 23. बीड – 1) श्री. टी. पी मुंडे 2) श्री. मनोज शिंदे 24. धाराशीव – श्री. राजन साळवी 25. नांदेड – श्री. सिद्धराम म्हेत्रे 26. लातूर – श्री. किशोर दराडे 27. बुलढाणा – श्री. हेमंत पाटील 28. परभणी – श्री.आनंद जाधव 29. नागपूर ग्रामीण- श्री. दिपक सावंत 30. नागपूर शहर – श्री. दिपक सावंत 31. गडचिरोली – 1) श्री. दिपक सावंत 2) श्री.किरण पांडव 32. भंडारा – श्री. गोपीकिशन बाजोरिया 33. अमरावती – श्री. नरेंद्र भोंडेकर 34. वर्धा – श्री. राजेंद्र साप्ते 35. यवतमाळ – श्री. हेमंत गोडसे 36. वाशिम – श्री. जगदीश गुप्ता 37. हिंगोली – श्री. हेमंत पाटील 38. अकोला – श्री. अभिजित अडसूळ 39. चंद्रपूर – श्री. किरण पांडव
भाजपवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेची राजस्थानमध्ये नवी खेळी
जयपूर : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. यानंतर राज्यात भाजपने अनेक ठिकाणी स्वतःची ताकद वाढवण्यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या. भाजपच्या हालचाली बघून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली तसच दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर स्वतःची बाजू मांडली. एवढी धडपड करुनही हाती जास्त काही लागत नसल्याचे बघून शिवसेनेने दबावासाठी नवी खेळी केली आहे. शिवसेनेच्या राजस्थानमधील नेत्यांनी तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जास्त जागांची मागणी केली आहे. आमची मागणी पूर्ण होणार नसल्यास राजस्थानमधील स्थानिकच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा विचार करू; असा इशारा शिवसेनेने दिला आहे. मागच्या वर्षी राजस्थानमध्ये तीन आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेना राजस्थानमध्ये मर्यादीत प्रमाणात सक्रीय झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील स्थानिकच्या सर्व जागा लढवण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्या या इशाऱ्यावर भाजपने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
