आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीने निर्णायक पाऊल उचलत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी राज्यभरातील सर्व पालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड तासांच्या बैठकीत जागावाटप, स्थानिक समीकरणे आणि रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली.
मुख्य मुद्दे :
- मुंबई व ठाणेसह सर्व महापालिका महायुती एकत्र लढणार
- एकमेकांच्या पक्षात कार्यकर्त्यांनी प्रवेश न करण्याची सहमती
- अंतर्गत कलह टाळणे आणि संयुक्त प्रचाराची तयारी
- लवकरच जागावाटप आणि प्रचार आराखडा

महाविकास आघाडीसाठीही या निवडणुका तितक्याच महत्त्वाच्या ठरणार असून, महायुतीच्या निर्णयामुळे राज्यातील महापालिका राजकारणात मोठी चढ-उतार पाहायला मिळणार आहेत.
