स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात असं म्हटलं आहे की २०३० पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न ४ हजार डॉलर्सच्या पुढे जाईल. हे ऐकायला छान वाटतं. पण आज देशातली परिस्थिती पाहिली, तर हा दावा किती खरा आहे, असा प्रश्न पडतो.
आज भारतात बेरोजगारी मोठी समस्या आहे. अनेक तरुण शिक्षण घेत असूनही त्यांना नोकÚया मिळत नाहीत. गावाकडे शेतीवर अवलंबून असलेले लोक पुरेसं उत्पन्न मिळवू शकत नाहीत. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. काही वेळा या तणावामुळे शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. हे चित्र खूप वेदनादायक आहे.
दरडोई उत्पन्न म्हणजे देशातील सगळ्यांचं सरासरी उत्पन्न. पण प्रत्यक्षात श्रीमंत लोक खूप श्रीमंत होत आहेत आणि गरीब लोक तिथेच अडकलेले आहेत. त्यामुळे ही सरासरी आकडेवारी खरी परिस्थिती दाखवत नाही. काही लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली म्हणून संपूर्ण देश श्रीमंत झाला असं म्हणणं चुकीचं आहे.
ग्रामीण भागात अजूनही पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या मूलभूत सोयींची कमतरता आहे. शेतक-यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. तरुणांना स्थिर नोक-या नाहीत. अशा परिस्थितीत ४ हजार डॉलर्स म्हणजे साधारण ३ ते ४ लाख रुपये. पण आज अनेक लोकांना महिन्याला १०-१५ हजारही मिळत नाहीत. त्यामुळे हे स्वप्न फार दूरचं वाटतं. विकास म्हणजे फक्त मोठे आकडे नाहीत. लोकांच्या जीवनात खरा बदल झाला पाहिजे. प्रत्येकाला काम मिळालं, शेतकÚयांना आधार मिळाला आणि गरिबांचं जीवन सुधारलं, तरच खरा विकास होईल. म्हणूनच सरकारने केवळ अहवालांवर न थांबता, सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यावर लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर २०३० चं स्वप्न फक्त कागदावरच राहील.
