काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने इशारा दिला आहे की बांगलादेशातील सध्याची परिस्थिती भारतासाठी १९७१ नंतरचे सर्वात मोठे धोरणात्मक आव्हान ठरू शकते. समितीच्या मते, बांगलादेशातील वाढती अस्थिरता ही इस्लामिक कट्टरपंथीयांचा उदय, चीन आणि पाकिस्तानचा वाढता प्रभाव आणि शेख हसीनांच्या अवामी लीगची पकड कमकुवत होणे या कारणांमुळे निर्माण झाली […]
Day: December 18, 2025
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा
सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. कायदे, नियम हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा महत्त्वाचे आहेत, त्यामुळे कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचं अजित पवार यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. हा राजीनामा पुढल्या […]
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भारतीय शिल्पकलेला जागतिक ओळख मिळवून देणारे, ज्यांच्या हातून इतिहासाला आकार मिळाला असे महान शिल्पकार राम वंजारा सुतार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते १०० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय कला विश्वावर शोककळा पसरली असून एका युगाचा अंत झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत […]
तपोवनातील वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती
नाशिकमध्ये भरणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम उभारण्यासाठी प्रस्तावित असलेल्या तपोवनातील वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने या वृक्षतोडीवर येत्या १४ जानेवारीपर्यंत अंतरिम स्थगिती आदेश दिला असून, या प्रकरणी सर्व संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक शहरातील एका जागरूक नागरिकाने तपोवनातील वृक्षतोडीविरोधात जनहित याचिका दाखल […]
बीजिंगने प्रदूषणावर कशी केली मात? जगासाठी ठरतोय आदर्श
: एकेकाळी जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये गणले जाणारे चीनची राजधानी बीजिंग आज स्वच्छ हवेच्या दिशेने मोठी झेप घेताना दिसत आहे. कडक धोरणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर बीजिंगने वायुप्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवले आहे. कोळशावर अवलंबित्व कमी करणे हा बीजिंगचा पहिला मोठा निर्णय ठरला. शहरातील कोळसा-आधारित वीज व हीटिंग प्रकल्प […]
गाड्यांत विमानासारखे नियम; अतिरिक्त सामानासाठी शुल्क लागू
रेल्वे प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवासादरम्यान निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान नेण्यासाठी प्रवाशांकडून आता अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. रेल्वेने स्पष्ट केले आहे की विमान प्रवासाप्रमाणेच कठोर सामान नियम लागू केले जातील. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की गाड्यांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान […]
