हॉटेलसारखी खोली मिळणार स्वस्तात
तुम्ही रेल्वे गाडीने प्रवास करीत असाल आणि तुम्हाला रात्री रेल्वे स्थानकावरच थांबावे लागणार असेल, तर आता तुम्हाला स्थानकावर रात्र काढावी लागणार नाही. भारतीय रेल्वे स्थानकातच प्रवाशांना राहण्यासाठी खोल्या उपलब्ध करून देते. त्यामुळे हॉटेल किंवा इतर निवासस्थान शोधण्याची गरज भासणार नाही. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे, या खोल्या अगदी वाजवी दरात मिळतील. आयआरसीटीसीच्या माध्यमातून केवळ ५० रुपयांमध्ये स्थानकावर हॉटेलसारखी रूम बुक करू शकता. या खोल्या वातानुकूलित आणि आरामदायी असून, सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत. खोल्यांचे दर खोलीबाबतची पसंत आणि मुक्कामाच्या अवधीनुसार बदलू शकतात.
जाणून घ्या किती आहे भाडे ? आयआरसीटीसी वेबसाईटनुसार, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर रिटायरिंग रूम बुकिंगचा दर १२ तासांच्या नॉन-एसी रूमसाठी १५० रुपयांपासून सुरू होतो आणि २४ तासांच्या एसी रूम बुकिंगसाठी ४५० रुपये मोजावे लागू शकतात.
२) मुंबई सीएसटीत एसी डारमेट्री १२ तासांसाठी १५० रुपये आणि २४ तासांसाठी २५० रुपयांपासून भाडे सुरू होते. डिलक्स रूम १२ तासांसाठी ८०० आणि २४ तासांसाठी १६०० रुपयांपासून सुरू होते.
३) लखनौत नॉन-एसी डॉरमेट्री १२ तासांसाठी ५० रुपयांपासून भाडे सुरू होते आणि २४ तासांसाठी ७५ रुपयांपर्यंत जाते. एसी डबल बेडरूमचे दर १२ तासांसाठी ३५० रुपये आणि २४ तासांसाठी ५५० रुपयांपासून सुरू होतात. असे करा ऑनलाईन बुकिंग १) सर्वप्रथम आयआरसीटीसी अकाऊंटमध्ये लॉग इन करा.
२) नंतर माय बुकिंग या पर्यायावर जा.
३) यानंतर तुम्हाला तुमच्या तिकीट बुकिंगच्या खाली रिटायरिंग रूमचा पर्याय मिळेल.
४) रूम बुकिंग प्रक्रिया पुढे जाण्यासाठी यावर क्लिक करा. ५) नंतर तुम्हाला तुमचा पीएनआर नंबर टाकण्याची गरज नाही.
६) त्याऐवजी काही वैयक्तिक आणि प्रवासाशी संबंधित माहिती द्यावी लागेल.
७) पेमेंट केल्यानंतर तुमची खोली यशस्वीरीत्या बुक केली जाईल.
या सुविधांशिवाय प्रवाशांच्या समस्या कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे सध्या अनेक विशेष गाड्या चालवत आहे. या विशेष गाड्या दिल्ली – बिहारसह विविध मार्गांवर उपलब्ध आहेत, ज्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकिटे सुरक्षित करता येतील. याशिवाय वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी १८ विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे.