कुष्ठरोगाचे नवे रुग्ण आढळण्यात चंद्रपूरपाठोपाठ पालघर जिल्ह्याचा दुसरा क्रम असल्याचे धक्कादायक चित्र आरोग्य खात्याच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. (Palghar ranks second in leprosy) कुष्ठरोगी आढळणाऱ्या शहरांच्या यादीत ठाणे सातव्या क्रमांकावर तर मुंबई सर्वांत शेवटी १४ व्या क्रमांकावर आहे.
कोरोना महामारीनंतर कुष्ठरुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की. क्षयरोगाप्रमाणे, नवीन कुष्ठरोगी शोधण्यासाठी घरोघरी तपासणी आशा आणि सामुदायिक आरोग्य कर्मचारी करतात. या तपासणीतच नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तपासणी मोहीम न राबवल्यास नवीन कुष्ठरोगी सापडत नाहीत. तपासणी वाढल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे, असे मोठे चमत्कारिक कारण वाढत्या रुग्णसंख्येचे दिले जात आहे. या तपासण्या झाल्या नसत्या तर यातील संसर्गजन्य रुग्ण हा भयंकर आजार पसरवत राहतील. त्यामुळे या तपासण्या वाढवण्याची गरज असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
जिल्हानिहाय रुग्ण
चंद्रपूर ४८७
जळगाव ३१९
धाराशिव २४१
पालघर ४४२
ठाणे ३०२
नागपूर २२९
यवतमाळ ३६३
पुणे २९६
रायगड २२८
गडचिरोली ३५४
नांदेड २८८
मुंबई ११७
अमरावती ३२५
नाशिक २६८
कुष्ठरोग्यांना दरमहा देणार ५०० रुपये
• नव्याने निदान झालेल्या बहुतांश रुग्णांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती अत्यंत बिकट असून, या णांना औषधांसह पौष्टिक आहाराची नितांत गरज असते. त्यामुळे क्षयरुग्णांच्या धर्तीवर आता कुष्ठरोग्यांना पोषण आहारासाठी दरमहा ५०० रुपये देण्याची योजना तयार करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.