
शिर्ला (अंधारे) गांधी पीस फाउंडेशन नेपाळने मानद डॉक्टरेट देऊन जेष्ठांचा सन्मान केला. सदर सोहळा नुकताच सेवाग्राम वर्धा येथे नुकताच उत्साहात संपन्न झाला.
यामध्ये महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष डॉअशोक तेरकर विदर्भ पश्चिम प्रादेशिक विभागाचे माजी सचिव डॉ सुहास काटे, प्रादेशिक विभागाचे कार्यकारी सदस्य डॉ रेणुकादास जोशी, अकोला जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष डॉ नारायण अंधारे, प्रसिद्धी प्रमुख डॉ रघुवीर देशपांडे, पातूर तालुका विकास मंचचे संयोजक डॉ शिवकुमार बायस यांचा समावेश आहे. डॉ रघुवीर देशपांडे यांचा विशेष सन्मान झाला असून मानद डॉक्टरेट सह त्यांना गांधी नोबेल पीस पुरस्कार व फाउंडेशनचे ॲम्बेसिडर पुरस्कार प्राप्त झाले.

पुरस्कारात पातुर तालुका आघाडीवर . पातुर तालुका जिल्हा अकोला आघाडीवर राहिला असून त्यामध्ये डॉ सुहास काटे, डॉ रघुवीर देशपांडे, डॉ नारायण अंधारे डॉ
. शिवकुमार बायस यांचा समावेश आहे. या सोहळ्याला विदर्भ पश्चिम प्रादेशिक उपाध्यक्ष श्री ना.मा . मोहोड यांची उपस्थिती होती सन्मानित झालेल्या सर्वांनी गांधी पीस फाउंडेशन नेपाळ व भारताचे प्रमुख डॉ सुनील परदेशी यांचे अभिनंदन केले.