
गेल्या पाच वर्षात विविधांगी व नाविन्यपूर्ण साहित्यिक उपक्रम राबवून अल्पावधीत साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या संस्थांमध्ये सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. यावर्षी संस्थेचे पाचवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संतनगरी शेगाव येथे दिनांक 4 व 5 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक मथुरा लॉन्स येथे संपन्न होणार आहे. उद्घाटकाच्या भूमिकेत माजी शिक्षणमंत्री ना. प्रा. वसंतराव पुरके लाभणार आहेत. कार्याध्यक्ष सुप्रसिद्ध वऱ्हाडी हास्यकवी नितीन वरणकार तर स्वागताध्यक्ष म्हणून शेगाव येथील सुप्रसिद्ध उद्योजक विनायक भारंबे यांनी जबाबदारी घेतल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष प्रविण बोपुलकर यांनी केली. प्रमुख अतिथी म्हणून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा केंद्रिय कामगार मंत्री ना. आकाशदादा फुंडकर, आमदार संजयजी कुटे,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे अध्यक्ष संजय एम. देशमुख उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्यिक सोहळ्यात वार्षिक पुरस्कार वितरण, विशेष ग्रंथदिंडी,महिला कविसंमेलन,गझल मुशायरा,कथाकथन,परिसंवाद अशा स्वरुपाच्या खास मेजवानीचे आयोजन शब्दवेलचे मार्गदर्शक तथा युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे, प्रा. प्रतिभा सराफ, आबासाहेब कडू यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या संमेलनाची प्रातिनिधिक नोंदणी व संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन शब्दवेल बुलढाणा जिल्हाध्यक्ष अजय माटे, उपाध्यक्ष दीपक सरप, रतन बगे,गोपाल तायडे, हरीश चिंचोलकर, केंद्रिय सचिव अश्विनी अतकरे, उपाध्यक्ष शीतल राऊत, रंजना कराळे खजिनदार देवेंद्र इंगळकर, सहसचिव रामदास गायधने केंद्रिय संघटन प्रमुख अमोल चरडे व्यवस्थापक प्रविण सोनोने व केंद्रिय प्रसिद्धी प्रमुख विलास पुंडले यांनी केले आहे.# Shabadwel Sahitya_Sammelan
