आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य नीलेश शाह यांचे मत
नवी दिल्ली: सोने आयात करण्याची सवय नसती तर भारत ५ हजार अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य खूप आधीच गाठू शकला असता, असे मत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अस्थायी सदस्य नीलेश शाह यांनी व्यक्त केले. गेल्या २१ वर्षांत भारतीयांनी केवळ सोन्याच्या आयातीवर सुमारे ५०० अब्ज डॉलर खर्च करण्यात आले,
२१ वर्षांत ३७५ अब्ज डॉलर्स खर्च
• अधिकृत आकडेवारीचा हवाला देत, कोटक अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले शाह म्हणाले की, भारतीयांनी गेल्या २१ वर्षांत निव्वळ आधारावर सोने आयातीवर ३७५ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. यासोबतच सोन्याच्या तस्करीच्या बातम्याही सातत्याने येत असतात.
गुंतवणूक केली असती तर जीडीपी वेगळा असता
• ते म्हणाले, जर तो पैसा सोन्याऐवजी टाटा, अंबानी, बिर्ला, वाडिया आणि अदानी यांसारख्या उद्योजकांमध्ये गुंतवला गेला असता
याकडे शाह यांनी लक्ष वेधले. आम्ही ५ हजार अब्ज डॉलरच्या जीडीपीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहोत. पण आपण एकाच सवयीपासून दूर राहिलो असतो तर खूप आधीच ५,००० अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठू शकलो असतो. कदाचित योग्य आर्थिक गुंतवणूक न केल्याने आपण भारताच्या जीडीपीचा एक तृतीयांश हिस्सा गमावला आहे, असे शाह म्हणाले