कोची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (28 फेब्रुवारी) ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातील पहिल्या स्वदेशी विकसित आणि निर्मित बोटीचे उद्घाटन केले.
ही ग्रीन हायड्रोजनवर चालणारी बोट शून्य कार्बन उत्सर्जित करते आणि आवाज न करता धावते. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी करण्यास मदत करेल. पंतप्रधान मोदींनी तमिळनाडूच्या थुथुकुडी येथून ऑनलाइन माध्यमातून या हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटीचे उद्घाटन केले. कोचीन शिपयार्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मधु एस नायर हे देखील यावेळी उपस्थित होते. बोट विकसित करणाऱ्या कोचीन शिपयार्डने म्हटले आहे की सागरी इंधन म्हणून ग्रीन हायड्रोजनचा वापर शाश्वत भविष्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा केंद्रबिंदू आहे. भारताने 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले आहे.
कोचीन शिपयार्डने एका निवेदनात म्हटले आहे की, ग्रीन बोट इनिशिएटिव्ह अंतर्गत विकसित केलेले हे अंतर्देशीय जलमार्ग जहाज, सागरी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविणारा एक पथदर्शी प्रकल्प आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपम म्हणाले, ही इंधन सेलवर चालणारी बोट उत्सर्जन आणि आवाजापासून मुक्त आहे. हे ऊर्जा कार्यक्षम होऊन ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी करते. (वृत्तसंस्था)