अकोला : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक पदासाठी मेगाभरती सुरू आहे. लिपिक संवर्गातील ८ हजार २३८ कनिष्ठ सहयोगी पदांसाठी ‘एसबीआय’कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवरून ७ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांची पूर्वपरीक्षा जानेवारी २०२४ मध्ये, तर मुख्य परीक्षा फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. लिपिकच्या ८, २३८ पदांपैकी ३,५१५ पदे सर्वसाधारण, १२८४ अनुसूचित जाती, ७४८ अनुसूचित जमाती, १९१९ ओबीसी, ८१७ ईडब्ल्यूएस पदे राखीव आहेत. उमेदवारांना केवळ एका राज्यासाठी अर्ज करता येणार आहे. लिपिक भरतीसाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता आहे. तसेच, जे विद्यार्थी अंतिम वर्षात आहेत त्यांनादेखील अर्ज करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.