अकोला : मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई तथा केन्द्र शासन नीति आयोग नोंदणीकृत संस्था कुटासा जि.अकोला येथील तरुणाई फाऊंडेशनच्या वतीने सातव्या अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन शनिवार व रविवार दि. 15 व 16 नोव्हेंबर रोजी अकोला येथे करण्यात आले आहे. अकोला येथील महाविद्यालयातील वसंत सभागृहात सकाळी 8 ते संध्याकाळी 10 अशा वेळेत दोन दिवस हे संमेलन चालणार आहे. अभिजात मराठी भाषेच्या प्रचार प्रसाराच्या उध्देशाने मराठीचा गजर करण्यासाठी या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नवोदित कवी, साहित्यिकांना एक हक्काचे विचारपीठ मिळवून देण्यासाठी हे संमेलन म्हणजे एक विलोभनिय वैचारीक सोहळा ठरणार आहे. गेल्या दहा वर्षात विविधांगी व नाविन्यपूर्ण साहित्यिक उपक्रम राबवून साहित्य क्षेत्रात अल्पावधित आपला अभिनव ठसा उमटविणाÚया संस्थांमध्ये तरुणाई फाऊंडेशन कुटासा ही संस्था अग्रेसर ठरलेली असून हे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. यावर्षी संस्थेचे हे सातवे अकोला जिल्हा साहित्य संमेलन आहे. युवा वऱ्हाडी लेखक, कथाकार सु पु अढाऊकर यांच्या अध्यक्षतेखाली राजराजेश्वर नगरीत हा संमेलनाचा सोहळा संपन्न होणार आहे. या संमेलनाला सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डॉ. बी. जी. शेखर पाटील, ज्येष्ठ साहित्यिक तथा सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई हे उद्घाटक म्हणून लाभणार आहेत. तर अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी स्विकारल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष संदीप देशमुख यांनी केली आहे. याप्रसंगी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री ना. आकाशदादा फुंडकर, श्रीपाद अपराजित, सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे सर डॉ.सदानंद देशमुख सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती संस्कृती मंडळ मुंबई, आमदार अमोल मिटकरी, आमदार रणधीर सावरकर माजी संमेलनाध्यक्षा प्रा. दिपाली सोसे,अकोला येथील सुप्रसिद्ध उद्योजक प्रा. डॉ. संतोष हुशे, शिवाजीराव देशमुख माजी अध्यक्ष जि.प. अकोला हे प्रतीक अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्यिक सोहळ्यात वार्षिक पुरस्कार वितरण, विशेष ग्रंथदिंडी, महिला कविसंमेलन, गझल मुशायरा, कथाकथन, परिसंवाद अशा स्वरुपाच्या खास मेजवानीचे आयोजन तरुणाईचे मार्गदर्शक तथा युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे, प्रा संतोष हुशे आतिष सोसे हिंमत ढाळे, तुळशीराम बोबडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम दिवसांत सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी, आ. मिटकरी यांची प्रगट मुलाखत, “अभिजात मराठी व भाषेचे भवितव्य“ या विषयावर परिसंवादाची मेजवानी आहे. कविसंमेलनात आ.की. सोनोने यांचे अध्यक्षतेखाली प्रशांत असनारे, नितीन देशमुख, अँड अनंत खेळकर, हिंमत ढाळे, अनंत राऊत, डॉ. शोभा रोकडे, आशा शिंदे, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर नितीन वरणकार, गौतम गुळवे, विजय सोसे, गजानन मते, प्रा. संजय कावरे, विठ्ठल कुलट, रविन्द्र महल्ले, का. रा. चव्हाण, धनंजय मिश्रा, धीरज चावरे, प्रशांत भोंडे, शिवराज जामोदे, देवानंद गहिले, नईम फराज, प्रवीण बोपुलकर, चाफेश्वर गांगवे, विशाल मोहोड, या कवींचा सहभाग राहणार आहे.त्यानंतर दुसया दिवशी आबासाहेब कडू यांचे अध्यक्षतेखाली कथाकथन, देवकाताई देशमुख यांचे अध्यक्षतेखाली गजल मुशायरा, अशी सारस्वताच्या प्रांगणातील भरगच्च साहित्याची मेजवानी आणि सोबतच व्यसनमुक्ती, पुस्तके व अभिजात मराठी भाषा संदर्भातील प्रदर्शन असा हा विलोभनिय सोहळा राहणार आहे. संमेलनाची प्रातिनिधिक नोंदणी व संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष संजय एम. देशमुख, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप देशमुख सचिव मंजू झांबरे रिता संदीप देशमुख आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. किरण वाघमारे प्रा. डॉ. गणेश मेनकार विक्रम सोनी, देव बाबू लूले, अनिल डाहेलकर, सचिन तायडे, दीपक महितकर, राहुल भगत, दिनेश छबिले, सुलभा देशमुख, कुशल राऊत, केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख विशाल बोरे यांनी केले आहे.
