प्रज्ञान पंडित
भाऊ देशमुख
विकासाचे पंख
बहुजना
ऑक्सफर्डमध्ये
विद्यावाचस्पती
विद्येची महती
विश्वामध्ये
रंजल्या गांजल्या
पीडित जनांचे
रान जखमांचे
तुडविले
शिवबा शिक्षण
कृतीतून ज्ञान
कृषीचे गगन
भारतात
व्हारे कृषकांनो
तुम्ही संघटीत
अन्यायाची जात
तुडविण्या
मंदिर संपत्ती
गोठवून घ्यावे
रयतेला द्यावे
उच्चज्ञान
मंदिर प्रवेश
अंबा सत्याग्रह
हक्काचा निग्रह
समानता
अण्णाला घातले
अस्पृश्य पितर
क्रांतीचा गजर
लोकमता
शिक्षणाची कास
मतीचा विकास
अंधाराचा नाश
जीवनात
विचार क्रांतीचे
प्रणेते साहेब
सूर्याचा रुबाब
सर्वकाळ
– डॉ. रमेश राठोड,
जवाहरनगर, अकोला
चलभाष : ७५८८५०२५८६
About The Author
Post Views: 69