वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
१८८१ च्या कायद्याच्या अंतर्गत राज्य सरकार, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश आपल्या अखत्यारितील बँक सुट्ट्यांची यादी करतात. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी भारतात बँक व सरकारी कार्यालयांना सुट्टी असते, त्यामुळे त्या दिवशी बँका बंद असतात, पण या व्यतिरिक्त राज्यातील सर्व बँका व सरकारी कार्यालये राष्ट्रीय उत्सव व सणांच्या निमित्ताने बंद असतात. येत्या नववर्षात म्हणजेच २०२३ मध्ये नेमक्या कोणत्या दिवशी बँका बंद असणार आहेत याविषयी माहिती देणारे परिपत्रक महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने जारी महाराष्ट्र सरकारने २०२३ च्या सार्वजनिक सुट्ट्यांचे पत्रक केले जारी करण्यात आले आहे. २०२३ मध्ये वर्षभरात रविवार व दुसरा आणि चौथा शनिवार वगळता तब्बल २४ सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन, १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन आणि २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या तीन राष्ट्रीय सुट्ट्या असून, यांच्यासह विविध सणांच्या निमित्ताने बँका बंद असतील. १८ फेब्रुवारी – महाशिवरात्री, १९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती, तारखेनुसार, ७ मार्च – होळी, २२ मार्च – गुढीपाडवा, ३० मार्च – रामनवमी, ४ एप्रिल – महावीर जयंती, ७ एप्रिल – गुड फ्रायडे, १४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, २२ एप्रिल – रमझान ईद, १ मे महाराष्ट्र दिन, ५ मे – बुद्ध पौर्णिमा, २८ जून – बकरी ईद, २९ जुलै – मोहरम, १६ ऑगस्ट – पारशी नववर्ष, १९ सप्टेंबर – गणेश चतुर्थी, २४ ऑक्टोबर – दसरा, १२ नोव्हेंबर – लक्ष्मी पूजन, १४ नोव्हेंबर – दिवाळी पाडवा, २७ नोव्हेंबर – गुरुनानक जयंती, २५ डिसेंबर – नाताळ अशा सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.