मुंबई : राज्यात गुटखा उत्पादन व विक्री करणाऱ्या गुन्हेगारी साखळीला आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा’ (मकोका) लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली आहे. या निर्णयामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) कारवाईला मोठी बळकटी मिळणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी […]
विदर्भ एडिटर्स फोरमच्या अध्यक्षपदी देवेंद्र गावंडे; अपराजित सचिवपदी निवड
नागपूर : विदर्भातील सर्व संपादकांना एकत्र आणणारे, सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेणारे आणि अभ्यासपूर्ण चर्चेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ‘विदर्भ एडिटर्स फोरम’ या संस्थेची औपचारिक स्थापना करण्यात आली आहे. समाजासमोर उभ्या असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर पत्रकारितेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना सुचवणे, समस्यांचा अभ्यास करणे आणि प्रबोधनात्मक भूमिका घेणे यासाठी या फोरमची निर्मिती करण्यात […]
बँक भरती निकाल जाहीर करण्याची सुधारित पद्धत जाहीर
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि उमेदवारांना निकालांची प्रतीक्षा कमी पडावी यासाठी अर्थमंत्रालयाने आज नवीन सुधारित आराखडा जाहीर केला. या आराखड्यानुसार आता देशभरातील सर्व बँकांच्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची एकसंध आणि टप्प्याटप्प्याने राबवली जाणारी पद्धत लागू होणार आहे. या नव्या प्रणालीमध्ये सर्वप्रथम स्टेट बँक […]
महाराष्ट्रात प्रत्येकावर८२हजारांचे कर्ज ; सतेज पाटील यांचा आरोप
नागपूर, राज्य शासनाने सादर केलेल्या पुरवणी मागण्या या आर्थिक गरजेपलीकडे जाऊन आगामी निवडणुकांचा विचार करून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मांडल्या गेल्या आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आज विधान परिषदेतील चर्चेत केला. राज्याने आधीच मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा घेतला असूनही सरकार अतिरिक्त खर्चाची तरतूद करत असल्याने अर्थव्यवस्था ढासळत […]
लाडकी बहीण योजनेचा हप्ता वेळेवर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपयांचा हप्ता योग्य वेळी देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. लाडकी बहीण योजनेसाठी २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज विभागाने पात्रतेनुसार ग्राह्य धरले आहेत, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे […]
२०२६ मधील चार ग्रहणे: सूर्य व चंद्रग्रहणांचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
या वर्षी चार ग्रहणे असतील. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि चंद्रग्रहणांना विशेष महत्त्व आहे. या काळात शुभ कार्ये आणि धार्मिक विधी करण्यास मनाई आहे. निष्काळजीपणा किंवा निष्काळजीपणाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जयपूर-जोधपूर येथील पाल बालाजी ज्योतिष संस्थेचे संचालक ज्योतिषी डॉ. अनिश व्यास यांनी सांगितले की, २०२६ मध्ये चार […]
महापालिका निवडणुका भाजप–शिवसेना एकत्र लढणार
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीने निर्णायक पाऊल उचलत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी राज्यभरातील सर्व पालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड तासांच्या बैठकीत जागावाटप, स्थानिक समीकरणे आणि रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. मुख्य मुद्दे : महाविकास आघाडीसाठीही या […]
चीनची क्रांतिकारक झेप: समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून गोडे पाणी व ग्रीन हायड्रोजन उत्पादन
बीजिंग (एजन्सी) : पिण्याच्या पाण्याची वाढती टंचाई आणि पेट्रोल-डिझेलला पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याच्या प्रयत्नात चीनने मोठी कामगिरी केली आहे. शांडोंग प्रांतातील रिझाओ येथे उभारलेल्या जगातील पहिल्या प्रकल्पाने समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून गोडे पाणी आणि भविष्यातील इंधन — ग्रीन हायड्रोजन तयार करण्यात यश मिळवले आहे. हे सर्व फक्त २४ रुपये प्रति घनमीटर या […]
ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद
सिडनी : ऑस्ट्रेलिया हा 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया पूर्णतः बंद करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. मंगळवारपासून TikTok, YouTube, Instagram, Facebook यांसह प्रमुख प्लॅटफॉर्मवर मुलांची प्रवेशवाट बंद करण्यात आली आहे. नवीन कायद्यानुसार टॉप 10 प्लॅटफॉर्मना अल्पवयीन खात्यांवर त्वरित बंदी घालावी, अन्यथा 3.3 कोटी डॉलर दंड भरावा लागेल. काही तंत्रज्ञान […]
तुकडेबंदी शिथिल करणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर; ६० लाख कुटुंबांना दिलासा
नागपूर : राज्यातील नागरी भागातील लहान भूखंडांवरील तुकडेबंदी शिथिल करणारे ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, 2025’ आज विधानसभेत मंजूर झाले. या निर्णयामुळे ६० लाख कुटुंबांच्या सातबाऱ्यावर स्वतंत्र नाव लागण्याचा मार्ग मोकळा झाला असून लहान भूखंडांची खरेदी-विक्री आता सुलभ होणार आहे. नवीन तरतुदींनुसार नियोजन प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यास वेगळी NA […]
