अमेरिकेची पहिल्या लसीला मान्यता
• वॉशिंग्टन, अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी चिकनगुनियासाठी जगातील पहिल्या लसीला मान्यता दिली. संक्रमित डासांमुळे पसरणारा या विषाणू अन्न आणि औषध प्रशासनाने जागतिक आरोग्य धोका असल्याचे म्हटले होते. मात्र, पहिल्या लसीला मान्यता मिळाल्यामुळे हा चिकनगुनियाचा विषाणू आता नाहीसा होणार आहे. युरोपच्या व्हॅल्व्हाने विकसित केलेली ही लस खलहळया नावाने विकली जाईल. १८ आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी ही लस मंजूर करण्यात आली आहे. ड्रग रेग्युलेटरने लिक्सचिक लसीला हिरवा कंदील दिल्याने विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये लसीच्या रोलआउटला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
चिकनगुनिया हा एक प्रकारचा ताप आहे, ज्यामुळे तीव्र सांधेदुखी होते. हे मुख्यतः आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया आणि अमेरिकेच्या काही भागात पसरलेले आहे. अमेरिकेच्या ड्रग रेग्युलेटरीने सांगितले की, चिकनगुनिया विषाणू नवीन भौगोलिक भागात पसरला आहे. ज्यामुळे रोगाचा जागतिक प्रसार झाला आहे. गेल्या १५ वर्षांत चिकनगुनियाची ५० लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. एफडीएचे वरिष्ठ अधिकारी पीटर मार्क्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, चिकनगुनिया विषाणूच्या संसर्गामुळे गंभीर आजार आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात. चिकनगुनिया विशेषतः वृद्ध प्रौढांसाठी आणि गंभीर उपचार घेत असलेल्या लोकांसाठी धोकादायक असू शकते. वैद्यकीय गरज लक्षात घेऊन या लसीला मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही लस मर्यादित उपचार पर्यायांसह संभाव्य गंभीर आजार रोखण्यासाठी प्रभावी ठरेल.
ही लस एकाच डोसमध्ये दिली जाते. उत्तर अमेरिकेतील ३,५०० लोकांवर दोन क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या. या लसीमुळे लोकांमध्ये डोकेदुखी, थकवा, आणि सांधे दुखणे, ताप कमी झाला. चाचण्यांमध्ये, लस घेतलेल्या १.६ टक्के लोकांमध्ये गंभीर परिणाम नोंदवल्या गेले. त्यापैकी दोघांना हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले.