गाढव वाचविण्यासाठी आफ्रिकन युनियनने घातली निर्यातीवर बंदी
गाढवीणीच्या दुधाला आयुर्वेदात औषध म्हणून फार महत्त्व आहे. या प्राण्याकडे आता चीनची नजर गेली आहे. पारंपरिक औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि लोकप्रिय मिठाई बनविण्यासाठी चीनमध्ये आफ्रिकेतून आयात केलेल्या हजारो गाढवांची रोज कत्तल सुरू आहे. यामुळे आफ्रिकेतील जनतेचे वस्तू वाहनाचे साधन कालबाह्य ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता आफ्रिका खंडातील ५५ देशांची शिखर संस्था असलेल्या आफ्रिकन युनियनने गाढवांच्या तस्करीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे चीनची काही हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेले उद्योग अडचणीत सापडले आहेत. कोरोना नेमका कोठून सुरू झाला? याविषयी स्वयंस्पष्ट अहवाल पुढे आला नसला, तरी चीनच्या वुहान प्रांतातून त्याचा उगम झाला, याकडे मात्र अनेकांनी अंगुलीनिर्देश केला आहे. विकृतीवर आधारित खाद्यसंस्कृती आणि प्रयोगशाळेमार्फत नरसंहाराची आयुधे बनविण्याचे काम चीनमध्ये चालते. याचा नवा पुरावा आफ्रिकन युनियनने घातलेल्या नव्या बंदीने पुढे आला आहे.