कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातल्या समस्या सोडवण्यासाठी शासन वचनबद्ध असून त्याकरता ११ सदस्यांची समिती नियुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शतकमहोत्सवी अखिलभारतीय नाट्यसंमेलना अंतर्गत महाबळेश्वर इथं आयोजित संमेलनाचं उद्घाटन 24 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नाट्य संस्कृतीला बळ देण्यासाठी राज्यातल्या ५२ नाट्यगृहांचं अद्ययावतीकरण करणार असून २३ नवीन नाट्यगृहं उभारणार आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल, माजी संमेलनाध्यक्ष मोहन जोशी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
About The Author
Post Views: 89