पृथ्वीपासून आता
चंद्रही दूर चालला
सखा सर्वांचाच
दूर दूर चालला.
प्रेमिकांचा प्रिय
अन कवींचा लाडका
नित्य नवा वाटणारा
चंद्र दूर दूर चालला.
युगयुगांचा प्रेरक
असा दूर दूर चालला
दिनमानावर त्याचा
असर होऊ लागला.
परिमाणेही घड्याळांची
भावी काळात बदलतील
दिवसही पंचविस तासांचे
मग बघाया मिळतील.
ग्रह ताऱ्यांनो तुम्ही
असे दूर दूर नका जावू
अंत मानवाचा तुम्ही
आता नका पाहू
4 ऑगस्ट 2024
नारायण अंधारे
शिर्ला (अंधारे)
7387277120
About The Author
Post Views: 85