राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या विचारात घेऊन त्यांना त्यांचे जीवन सुसह्यपणे जगता यावे ही बाब विचारात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 यास मा. मंत्रीमंडळाने दि. 30/9/2013 रोजी मान्यता दिली आहे.

त्यातील तरतुदीनुसार मा.मूख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 23 मे 2016 च्या शासन निर्णयान्वये ज्येष्ठ नागरिक कार्यकारी समिती (स्टेट कौन्सिल) गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या मान्यवरांचीअशासकीय सदस्य म्हणून वर्णी लागली आहे यामध्ये अण्णासाहेब टेकाळे (कोकण विभाग) बारकु पाटील (नाशिक विभाग) अरविंद कुळकर्णी (पुणे विभाग) भाष्कर पाटील औरंगाबाद विभाग नानासाहेब इंगळे (अमरावती विभाग) अविनाश तेलंग (नागपूर विभाग) यांचा समावेश झाल्याबद्दल. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभि. विनायकराव पांडे अतिरिक्त मुख्य सचिव फेस्कॉम, पुरुषोत्तम गावंडे, अध्यक्ष विदर्भ पश्चिम प्रादेशिक विभाग, ना.मा. मोहोड उपाध्यक्ष, चोथमल सारडा माजी अध्यक्ष, डॉ सुहास काटे माजी सचिव, तुळशीराम बोबडे सदस्य, जय कृष्ण वाकोडे सदस्य, नारायण अंधारे अध्यक्ष जिल्हा समन्वय समिती, चंद्रकांत कुळकर्णी अध्यक्ष महानगर समन्वय समिती यांनी अभिनंदन केले.