उच्च ताप, डोक्याला दुखापत ही आहेत कारणे
फिट्स म्हणजे मेंदूतील विद्युत क्रियाकलापांत अनियंत्रित बदल झाल्यामुळे येणारे झटके. यामुळे व्यक्तीच्या शरीराची हालचाल, चेतना आणि आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव क्षणिक काळासाठी हरवून जाते. या स्थितीमध्ये, मेंदूतील पेशी योग्य प्रकारे सिग्नल पाठवू शकत नाहीत, ज्यामुळे शरीरात अनियमित हालचाली, संवेदना बदल आणि बेशुद्ध येऊ शकतात. संवेदना, वर्तन, जागरूकता आणि स्नायूंच्या हालचालींमध्ये बदल फिटस्मुळे घडवतात. ट्यूमर, स्ट्रोक किंवा आनुवंशिक विकार, उच्च ताप, डोक्याला दुखापत, ड्रग्स किंवा अल्कोहोल यामुळेही फिट्स येऊ शकतात.
फिट्स या आजाराचा प्रकार कोणता ?
फिट्स हा मेंदूशी संबंधित एक प्रकारचा आजार आहे, ज्याला अपस्मार (एपिलेप्सी) देखील म्हणतात. या आजारात, मेंदूतील विद्युत क्रियाकलाप बिघडतात आणि त्यामुळे अचानक झटके येतात. अपस्मार, उच्च ताप (तापाचे झटके), डोक्याला दुखापत, मेंदूचे संक्रमण, मेंदूतील ट्यूमर, स्ट्रोक, ड्रग किंवा अल्कोहोल काढणे, काही आनुवांशिक विकार, चयापचय असंतुलन, विशिष्ट औषधे, आदींमुळे फिट्स येते. अचानक फिट आल्यास काय कराल ?
| फिट आल्यावर रुग्णाला सुरक्षित ठिकाणी ठेवावे आणि त्याच्या आसपासच्या धोकादायक वस्तू दूर कराव्यात. तसेच, रुग्णाच्या डोक्याखाली मऊ वस्तू ठेवाव्यात. तसेच त्याच्या सभोवतालचे वातावरण शांत ठेवून रुग्णाला एका बाजूला वळवावे.
फिट्स च्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये
फिट्स हे एक गंभीर लक्षण असून याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य निदान आणि उपचार घेतल्यास यावर नियंत्रण मिळवता येते आणि व्यक्ती सामान्य जीवन जगू शकतात.
जर झटके पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकले किंवा एकापाठोपाठ अनेक झटके आले व व्यक्तीला शुद्ध आली नाही, तर रुग्णाला डॉक्टर किंवा रुग्णालयात उपचार करण्यासाठी घेऊन जावे. घरगुती उपचार न करण्याचे आवाहन केले आहे.
