Fermented Food Benefits फर्मेंटेड फूड म्हणजेच आंबवलेले पदार्थ. इडली, डोसा हे पदार्थ तयार करताना सर्वात आधी त्याचे पीठ आंबवले जाते. आंबवलेले पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आंबवण्याच्या प्रक्रियेत बॅक्टेरिया आणि यीस्टसारखे सूक्ष्मजीव स्टार्च आणि साखर सारख्या कर्बोदकांमधे अल्कोहोल किंवा अॅसिडमध्ये रूपांतरित करतात. त्यामुळे जास्त प्रमाणात आंबवलेल्या पदार्थांची चवदेखील थोडी आंबट होते. आंबवण्याच्या प्रक्रियेत चांगले जीवाणू वाढतात. या जीवाणूंना प्रोबायोटिक असे म्हणतात. त्यांचा आरोग्यासाठी अतिशय चांगला लाभ होतो. आंबवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने ‘हे’ लाभ मिळतात…
• प्रोबायोटिक : बहुतेक आंबवलेल्या पदार्थांमध्ये चांगले जीवाणून असतात. जे प्रोबायोटिक असतात. हे जीवाणू तुमच्या आतड्यातील बॅक्टेरियाचे संतुलन पुनर्संचयित करण्यास मदत करतात आणि पचनासंबंधित सर्व समस्या दूर करतात.
• पचनास मदत : नैसर्गिक साखर आणि स्टार्चचे विघटन झाल्यामुळे आंबवलेले पदार्थ पचायला सोपे असतात.
• आतड्यांना लाभ : जेव्हा आपण काही पदार्थ आंबवतो तेव्हा आपण त्यांच्या सेवनाने आरोग्य क्षमता वाढवण्यास मदत करत असतो. आतड्यातील आरोग्यदायी बॅक्टेरिया वाढवून शरीराला ‘बी’ जीवनसत्त्व आणि व्हिटॅमिन ‘के’ तयार करण्याची क्षमता निर्माण करते.
• मूड सुधारतो : आंबवलेल्या पदार्थांमध्ये ‘लॅक्टोबॅसिलिस हेल्वेटिकस’ आणि ‘बीफीडोबॅक्टेरिया लोंगम’ हे दोन गुणधर्म आढळतात. यामुळे मानसिक ताण-तणाव आणि डिप्रेशनसारख्या समस्येंवर मात करण्यास मदत करतात.
• हृदयास पोषक : आंबवलेले पदार्थ हा पौष्टिक आणि संतुलित आहार आहे. या आहारामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. तसेच, कोलेस्ट्रॉल बॅलेन्स आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
• रोगप्रतिकारक शक्ती : आंबवलेल्या पदार्थांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार कमी होतात. व्हिटॅमिन सी, आयर्न, झिंक इत्यादी गुणधर्म अशा पदार्थांमध्ये आढळतात.
• वजन घटवणे : अनेक संशोधनानुसार, आंबवलेल्या पदार्थांमुळे वजन व पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते.