StrokePrevention इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या २०२३ च्या लॅन्सेट जर्नलच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, २०५० पर्यंत भारतासह कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे १ कोटी मृत्यू होऊ शकतात. २०२१ च्या ‘आयसीएमआर’ च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, स्ट्रोक हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे आणि भारतात अपंगत्वाचे सहावे प्रमुख कारण ठरत आहे. ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वांशिवाय मेंदूच्या मृत पावतात, ज्यामुळे कायमस्वरूपाचे नुकसान होते किंवा मृत्यू देखील होतो किंवा अस्पष्ट बोलणे अशा समस्या येतात. याबाबत अधिक माहिती न्यूरोसर्जन डॉ. नीरज सिंग देत आहेत.
महिलांमधील स्ट्रोकला कारणीभूत घटक : उच्च इस्ट्रोजेन पातळी असलेल्यांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर, रक्ताच्या गुठळ्या होण्यास कारणीभूत ठरतात. ज्यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते. मायग्रेन ही महिलांमध्ये एक सामान्य स्थिती जी धूम्रपान किंवा गर्भनिरोधक गोळांचा वापर हेदेखील स्ट्रोकचे कारण आहेत. हे घटक महिलांना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर स्ट्रोकची शक्यता निर्माण करतात. निरोगी जीवनशैली बाळगणे, अंतर्निहित आरोग्य स्थिती व्यवस्थापित करणे आणि हार्मोनल बदलांचे निरीक्षण करणे हे महिलांमध्ये स्ट्रोक टाळण्यास मदत करू शकते. कारणीभूत घटक कोणते ? रजोनिवृत्तीनंतर हार्मोनल बदल : रजोनिवृत्तीनंतर कमी इस्ट्रोजेन पातळी हृदय आणि रक्तवाहिन्यांना प्रभावित करते ज्यामुळे स्ट्रोकचा धोका होतो. रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना अनेकदा उच्च रक्तदाबाचा त्रास होतो जो पुन्हा स्ट्रोकसाठी एक जोखीम घटक आहे.
गर्भधारणेशी संबंधित बदल : प्रीक्लेम्पसिया ( उच्च रक्तदाब) आणि गर्भावस्थेतील मधुमेह स्ट्रोकला कारणीभूत ठरतात आणि वेळेवर व्यवस्थापन आणि औषधोपचारांची आवश्यकता भासते. उच्च रक्तदाब हे वयस्कर महिलांमध्ये स्ट्रोकला कारणीभूत घटकांपैकी एक प्रमुख कारण ठरते आहे. नियमित तपासणी, व्यायाम आणि औषधांनी त्याचे व्यवस्थापन करण्यास मदत करतील.
अनियमित हृदयाचे ठोके (अॅट्रियल फायब्रिलेशन) : वृद्ध महिलांमध्ये ही एक सामान्य घटना आहे आणि त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात ज्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो. स्ट्रोक रोखण्यासाठी औषधांसह योग्य उपचार आवश्यक आहेत. StrokePrevention
धूम्रपान : रक्तवाहिन्यांवर परिणाम करते आणि रक्ताच्या गुठळ्या वाढतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. धूम्रपान सोडल्याने स्ट्रोकचा धोका टाळता येतो. लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल वाढवू शकतो, यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते. दररोज व्यायाम करा, वजन नियंत्रित राखणे, पौष्टिक आहाराचे सेवन, वेळोवेळी रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल पातळी तपासणे आणि तज्ज्ञांच्या मदतीने त्यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

मद्यपान : अति प्रमाणात मद्यपान केल्याने रक्तदाब वाढतो आणि वजन वाढते, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. स्ट्रोक रोखण्यासाठी अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे गरजेचे आहे. #StrokeProblem #StrokeAwareness #StrokeRecovery #HealthTips #BrainHealth #SupportForStroke #StrokeSymptoms #StrokeEducation #WellnessJourney #Healthcare #StrokeSurvivor #BetterHealth #HealthyLiving #EmotionalSupport #PreventStroke #StrokeCommunity #HealthConversations #NeuroHealth #Mindfulness #StrokePrevention