
शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत असून त्यानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यंदा पावसाचं सावट असूनही सजावटीसह लागणारं साहित्य, मातीचे घट, झेंडूची फुलं यांच्या खरेदीसाठी राज्यात बहुतेक सर्व बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. घरगुती तसंच सार्वजनिक मंडळांमध्ये देवीच्या प्रतिष्ठापनेची तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. रंग, उत्साह आणि आनंदाचं प्रतीक असलेल्या या नवरात्रीनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे.

About The Author
Post Views: 68